लाहोरमध्ये बॉम्बस्फोट ; ३ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू, १८ जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये लाहोर येथील दाता दरबारच्या बाहेर स्फोट झाला आहे. या स्फोटात तीन पोलिसांचा मृत्यू झाला असून, १८ जण जखमी आहेत.

पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तसंस्था जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, दाता दरबार दर्ग्याच्या बाहेर झालेल्या स्फोटात तीन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून, या स्फोटात १८ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

https://twitter.com/syedazmatjmc/status/1125981822888947713

सूत्रांच्या माहितीनुसार, हा स्फोट पंजाब पोलिसांच्या एलिट फोर्स वॅनला टार्गेट करण्यासाठी करण्यात आला होता. परंतु याची अधिकृतरीत्या खातरजमा झालेली नाही.