हिरड्यातून रक्त येणं म्हणजे काय ? जाणून घ्या ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’

पोलिसनामा ऑनलाइन – आज आपण हिरड्यातून रक्त येण्याची कराणं, लक्षणं आणि उपाय जाणून घेणार आहोत.

हिरड्यातून रक्त का येतं ?

जर तुमच्या हिरड्यातून रक्त येत असेल तर शरीर अस्वस्थ किंवा हिरड्या रोगग्रस्त असण्याचा हा संकेत आहे. जर ही स्थिती तुम्हाला टाळायची असेल तर दातांची स्वच्छता आणि निगा राखणं गरजेचं आहे.

काय आहेत लक्षणं ?

– हिरड्यातून रक्त येण्याआधी त्यात सूज येते.
– दात घासताना किंवा फ्लॉक्स केल्यावर हिरड्यातून रक्त येतं.
– जसजसा हिरड्यांचा रोग वाढतो रक्त येण्याचं प्रमाणही वाढतं.
– श्वासांमध्ये दुर्गंध
– अन्न चावताना अडचण येणं किंवा वेदना होणं
– दात जर खेचला तर तो हिरडीतून लगेच बाहेर येणं
– दातांमध्ये संवेदनशीलता वाढल्यानं दात पडायला सुरुवात होते.
– हिरड्यांमध्ये पस साठणं

हिरड्यातून रक्त येण्याची कारणं

1) दात चुकीच्या पद्धतीनं घासणं किंवा कडक ब्रशचा वापर करणं
2) दातांची स्वच्छता कमी होणं
3) हिरड्या आणि दातांच्या थरांवर प्लाक तयार झाल्यामुळं संसर्ग होणं
4) गर्भधारणेदरम्यान हार्मोन्सध्ये बदल होणं
5) दातांची स्वच्छता कमी होणं
6) व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन के ची कमतरता
7) रक्तस्त्रावाचा विकार
8) रक्त पातळ करणारी औषधं
9) रक्ताचा कर्करोग जेस की ल्युकेमिया
10) अयोग्य दंत चिकित्सा
11) मधुमेह
12) धूम्रपान

कसं केलं जातं निदान ?

1) रक्त तपासणी – कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर किंवा सी रिअ‍ॅक्टीव्ह प्रोटीन वाढल्यानंही हिरड्या आणि दातांधील रोग दर्शवले जातात. संपूर्ण रक्त गणना हे शरीरातील संसर्ग ओळखण्यासाठी मदत करते.

2) एक्स रे – जॉ बोन एक्स रे च्या मदतीनं हिरड्या आणि जबड्याच्या दातांमध्ये असलेले रोग शोधण्यास मदत होते.

काय आहेत उपचार ?

1) योग्यरित्या ब्रश करणं
2) दातांची स्वछता करणं
3) अँटीबायोटीक्स औषधांमुळं संसर्गापासून बचाव होतो.
4) गरम पाणी आणि हायड्रोजन पॅरोक्साईडनं तोंड धुणं. यामुळं प्लाकचा थर निघून जातो.
5) व्हिटॅमिन सी किंवा केच्या सप्लीमेंट्स
6) धूम्रपान करणं बंद करणं
7) तंबाखू किवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन टाळणं
8) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अ‍ॅस्पिरीन सारखी रक्त पातळ होणारी औषध घेणं टाळावं.
9) नियमित दातांची तपासणी
10) नियमित दातांची स्वच्छता करणं

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.