‘ढबुडी बाबा’चा ‘पर्दाफाश’, बाहुलीला देवी सांगून करत होता भलतेच ‘उद्योग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरात मध्ये ‘ढबुडी बाबा’ नावाने प्रसिद्ध असलेल्या एका ढोंगी बाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘ढबुडी बाबा’ नावाने आपला धंदा चालवणाऱ्या धीरज ओड ला कोणीही पाहिलेले नाही. जसे त्याची पोलखोल झाली तेव्हापासून धीरज फरार आहे.

ढोंगी बाबा का खुलासा- गुड़िया को देवी बताकर करता था ठगी

विशेष म्हणजे ‘ढबुडी बाबा’ आपल्या सोबत एक बाहुली ठेवायचा आणि स्वतःचे तोंड एखाद्या ओढणीने झाकून घेऊन लोकांच्या समस्या सोडवायचा. हे बाबा धर्माच्या नावावर अंधविश्वास पसरवत असे. विशेष म्हणजे अनेक मोठे मंत्री, आमदार, पोलीस कर्मचारी बाबांचे भक्त होते.

ढोंगी बाबा का खुलासा- गुड़िया को देवी बताकर करता था ठगी

आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर या बाबाला लोक श्रीफळ, अगरबत्ती, ओढणी आणि पैसेही देत असत. त्यामुळे या ढोंगी बाबाकडे करोडो रुपयांची संपत्ती जमा झाली होती.

ढोंगी बाबा का खुलासा- गुड़िया को देवी बताकर करता था ठगी

विशेष म्हणजे या बाबाचे कर्मचारी इच्छा पूर्ण झालेल्या भक्तांचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करत असे ज्यामुळे गर्दी जमायला मोठ्या प्रमाणावर मदत होत असे.

ढोंगी बाबा का खुलासा- गुड़िया को देवी बताकर करता था ठगी

हा बाबा खेळण्यातील बाहुली आपल्या सोबत ठेवत असे गुजरातीमध्ये बाहुलीला ‘ढबुडी’ असे म्हणतात त्यामुळे या बाबाला सगळे जण ‘ढबुडी बाबा’ असे म्हणत असत. बाबांचे सोशल मीडियावर खूप जास्त फॅनफॉलोईंग आहे.

आरोग्यविषयक वृत्त –