मुलगा हवा म्हणून मांत्रिकाकडे गेली महिला, शरीरात ठोकला खिळा, झाला मृत्यू

जोधपूर : वृत्तसंस्था-  राजस्थानच्या भरतपुरमध्ये पुत्रप्राप्तीसाठी एका महिलेला अंधश्रद्धेला बळी पडून मांत्रिकाकडे जाणे महागात पडले. या मांत्रिकाने तंत्र-मंत्राने उपचार करताना महिलेचा जीव घेतला. आता पोलिसांनी तांत्रिकाला अटक केली आहे. भरतपुरच्या अस्तावन गावात एका महिलेला दोन मुली आहेत आणि आता मुलगा व्हावा, असे तिला वाटत होते. यासाठी ती एका तांत्रिकाकडे गेली. अगोदरच आजारी असलेली ही महिला जेव्हा मांत्रिकाकडे गेली तेव्हा आरोपी मांत्रिकाने तिच्या शरीरात वाईट आत्मा असल्याचे सांगितले.

आजारी महिला या अंधश्रद्धेला बळी पडली आणि डॉक्टरकडे जाण्याऐवजी आपल्या पतीसोबत त्या मांत्रिकाकडे जाऊ लागली. मांत्रिकाने दावा केला की, तिच्या शरीरात भूत-प्रेताचे अस्तित्व आहे आणि त्याने महिलेवर उपचार करण्यास सुरूवात केली. मांत्रिकाकडून उपचार करून घेतल्यानंतर पूनमची तब्येत आणखी बिघडली. जेव्हा कुटुंबिय तिला घेऊन हॉस्पीटलमध्ये गेले तेव्हा तिचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या सासरच्या लोकांनी मांत्रिकाविरूद्ध खुनाची तक्रार दाखल केली आहे.

माहितीनुसार, मृत महिलेचे हात, पाय आणि डोक्यासह अनेक भागात जखमा आणि जळाल्याचे व्रण आढळले. मृत महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी लोखंडाच्या खिळ्यांची छिद्रसुद्धा आहेत. मांत्रिकाने पुत्रप्राप्तीसाठी महिलेच्या शरीरात खिळे ठोकले आणि अनेक ठिकाणी चटकेसुद्धा दिले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. आरोपी मांत्रिकाने आपल्या जबाबात म्हटले की, तो भूत-प्रेतांचे उपचार करतो आणि महिलेला जखमी त्याने केले नाही तर ती जिन्यावरून पडल्याने जखमी झाली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like