मतदार नोंदणी केंद्रावर BLO नी चक्क दांडीच मारली

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – लाेकसभा निवडणुक काही दिवसावर होणार असल्याने भारत निवडणुक आयाेगाचे आदेशानुसार मतदार नोंदणी विशेष मोहिम सुरु करण्यात आली.

याअनुषगाने शहरातील प्रत्येक केंद्रात शनिवार,रविवारी सर्व बिएलओ यांना सुचित करण्यात आले हाेते. दिनांक 23/ 2/2019 ते 24/02/2019 पर्यंत मतदार नोंदणी विशेष मोहिम सकाळी 8 ते 5 या वेळात बिएलओ संबंधित मतदान केंद्रावर थांबून मतदार नोंदणी करावी.मात्र रविवारी अनेक मतदान केंद्रावर बिएलओ यांनी चक्क दांडीच मारल्याचे दिसून आले.  तर काही केंद्रात बिएलओ नागरीकांची आतुरतेने वाट पाहत कंटाळ आल्याने गप्पा,टप्पा,तर मोबाईल मधील गेम खेळण्यात गर्क दिसले.नागरिकांना आयाेगाच्या संधीचा लाभ घेता आला नाही.

सदर बाबतची तक्रार त्याच वेळी नागरिकांनी तहसील कार्यालयात निवडणुक शाखेत केली.निवडणुक नायब तहसीलदार खैरनार उपस्थित हाेते.शाळ क्र.20 मध्ये सहा पैकी दाेनच तर.शाळ क्र. 5 व 25,केंद्रावर एकही बिएलओ उपस्थित नव्हते केंद्रात नागरीकांनी नाव नोंदणी , दुरुस्तीसाठी गर्दी केली होती. बिएलओनी केंद्रावर दांडी मारल्याने नागरीकांची निराशाच झाली.काही वेळ केंद्रात तिष्ठत नागरीकांनी घराकडची वाट निवडली.