पुणे-लोणावळादरम्यान रेल्वेचा ब्लॉक, ‘या’ लोकल महिनभर रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-लोणावळा दरम्यानच्या रेल्वेमार्गाच्या देखभाल, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर दुपारी धावणाऱ्या दोन लोकल रद्द करण्यात आले आहे. देखभाल आणि दुरुस्तीचे काम 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये करण्यात येणार असून या दरम्यान दुपारी 1 आणि 2 ची लोकल रद्द करण्यात आली आहे.

पुणे रेल्वे प्रशासनाने पुणे ते लोणावळा स्थानकादरम्यान रेल्वेमार्गाच्या तांत्रिक कामासाठी तसेच देखभाल, दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या काळात धावणाऱ्या दोन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दुपारी एक वाजता पुणे स्थानकावरून सुटणारी पुणे-लोणावळा आणि दुपारी दोन वाजता लोणावळा स्थानकावरून सुटणारी लोणावळा-पुणे लोकल रद्द करण्यात आली आहे.

रेल्वेच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामामुळे दुपारच्या सत्रातील दोन लोकल रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे करणे गरजेचे असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Visit : policenama.com