कान बंद होणं म्हणजे काय ? जाणून घ्या ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  कान बंद होणं म्हणजे काय, याची कारणं, लक्षणं आणि उपाय याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

कान बंद होणं म्हणजे काय ?
नाकाच्या मागच्या भागाला युटाचियन ट्युब नावाच्या नळीनं कानाचा मध्यभाग जोडला गेलेला असतो. जर या नळीत काही अडथळा आला तर कान बंद होतो. अशा वेळी कान भरल्या सारखा वाटतो किंवा त्यावर काही दबाव आला आहे असं वाटतं. ही नळी बंद होण्याची अनेक कारणं आहेत. कानात संसर्ग होणं किवा इयर प्रेशरमध्ये अचानक बदल झाल्यानंही असं होतं.

काय आहेत लक्षणं ?
1) चक्कर येणं
2) खोकला
3) कान दुखणं किंवा भरल्यासारखा वाटणं
4) जो कान बंद आहे त्याला खाज येणं
5) कानातून डिस्चार्ज होणं किंवा घाणं वास येणं
6) कोणत्याही बाह्य आवाजाशिवाय कानात रिंग सारखा किंवा पॉपिंगचा आवाज येणं
7) जो कान हंद आहे त्याची ऐकण्याची क्षमता कमी होणं.
8) ऐकण्यास त्रास होणं

काय आहेत याची कारणं ?
1) कानात जास्त मळ साठणं आणि तो बाहेर न पडणं.
2) बॉल पॉईंट पेन किंवा पिना अशा वस्तूंच्या मदतीनं कान साफ करणं
3) सायनस संसर्ग, सर्दी किंवा ॲलर्जीमुळं युटाचियन ट्युबवर सूज येणं
4) द्रव साचणं
5) कानातील संसर्ग
6) गाडी चालवताना किंवा विमानात प्रवास करताना दबावात बदल होणं

कसं केलं जातं निदान ?
ऑटोस्कॉप नावाच्या एका साधनाद्वारे कान बंद झाल्याचं निदान केलं जातं. यात प्रकाशाचा वापर होतो आणि आतला कान आकारात मोठा दिसतो. यामुळं डॉक्टरांना कान तपासणं सोपं जातं.

कान बंद झाल्यावर केले जातात हे उपचार
जर तुमची युटाटियन ट्युब सर्दीमुळं किंवा उंचावर गेल्यामुळं बंद झाली असेल तर खालील उपचार करावेत.
1) शुगर फ्री च्युईंगम खावं किंवा गिळावं
2) जांभई दिली तरी युटाचियन ट्युब मोकळी होते.
3) जर वरील उपाय करून फरक पडला नाही तर नाक आणि तोंड बंद ठेवा आणि हळूहळू श्वास घेण्याचा प्रयत्न करा. पॉपिंग आवाज आला तर समजून घ्या ट्युब मोकळी झाली आहे.

जर तुमचा कान कॅनॉलमधील मळामुळं बंद झाला असेल तर खालील उपचार करावेत.
1) क्युरेट नावाच्या एका लहान आणि वक्र साधनाच्या मदतीनं डॉक्टर अतिरीक्त मळ काढतात.
2) सक्शन प्रेशरचा वापर करूनही तुम्ही अतिरीक्त मळ काढू शकता.
3) जर वारंवार मळ होत असेल तर डॉक्टर मळ काढणारी औषधं देतात. यामुळं मळ पातळ होतो आणि नंतर तो कॉटन किंवा इयर बडच्या मदतीनं काढला जातो.
4) ज्यांना ॲलर्जी होते त्यांना स्टिरॉईड्स औषधे नाकात टाकायला दिली जातात. किंवा पिण्यासाठी औषधं दिली जातात.
5) जर संसर्ग झाला असेल कर अँटीबायोटीक्स दिली जातात.
6) कधी कधी युटाचियन ट्युब मोकळी करण्यासाठी शस्त्रक्रिया देखील केली जाते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.