धक्कादायक ! विकृत टॅक्सीचालकाचं महिला प्रवाशासमोर ‘हस्तमैथुन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत टॅक्सी आणि कॅब ने प्रवास करणं लोकांना सोयीचं आणि सुरक्षित वाटतं. परंतु काही वेळा या प्रवासातही महिला व मुलींना काही छेडछाडीच्या घटनांना सामोरं जावं लागत. अशातच एका २१ वर्षीय तरूणीने मुंबईतल्या टॅक्सीमध्ये आलेला धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर कथन केला आहे. २७ जून रोजी घडलेला हा अनुभव अत्यंत किळसवाणा असल्याचे सांगताना तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे.

मुंबईत अनेक वर्षांपासून राहणाऱ्या डेबलीना साहा हिने इंस्टाग्राम वर हा व्हिडिओ शेअर केला. यात तिने म्हटले आहे, ‘हि पोस्ट शेअर करावी की नाही यासंदर्भात अनेक तास विचार केल्यानंतर मी हे सगळं शेअर करत आहे. (मी आधीच स्पष्ट करते कि मी सामान्य जीन्स आणि टॉप परिधान केला होता. कारण मी काय घातले होते यावरून तुमची मते आणि अंदाज तयार होऊ शकतात). सिद्धीविनायक मंदिरातून निघाल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी टॅक्सी केली (मला वाटतं हा अत्यंत दुर्दैवी निर्णय होता.) यावेळी माझ्यासोबत माझी आई आणि बहिणदेखील होती. मी या टॅक्सीत बसल्यानंतर चालकाने त्याच्या पँटची झिप उघडून माझ्यासमोरच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. हि घटना सकाळी ९:३० ला घडल्याचे तिने सांगितले.

तिने पुढे म्हटले कि, ‘मी मुंबईत पूर्वीपासून राहत असून अशा कोणत्याच घटनेला मी याआधी कधीच सामोरी गेली नाही, हे शहर सर्वाधिक सुरक्षित म्हटलं जातं. मात्र माझ्यासारख्या स्थानिक मुलीसोबत असा प्रकार घडू शकतो तर तर दुसऱ्या ठिकाणांहून इथे येणाऱ्या मुलींना अशा घटना पाहून काय वाटेल. अशा विकृत लोकांमुळे असुरक्षिततेची भावना पसरत असून यात या शहराचा नाही तर या लोकांचा दोष आहे.’ यानंतर चालकाला टॅक्सी थांबवायला सांगिल्यावर त्याने नकार देत माफी मागितली. डेबलीनाने वैतागून पोलीसात जाण्याची भाषा केल्यावर त्याने ‘मी गरीब आहे, मला माफ करा’ अशी विनवणी करायला सुरुवात केली. पण गरीब असल्याने तुम्हाला दुसऱ्यांचे लैंगिक शोषण करण्याची सूट तुम्हाला मिळत नाही असे तिने स्पष्ट केले.

हीच घटना जर एखाद्या रात्री मी एकटीच असताना घडली असती तर काय झालं असतं, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. यापूर्वी मी अशा घटनांबद्दल ऐकले होते परंतु हे सगळे धक्कादायक आणि किळसवाणे असल्याचे तिने सांगितले. त्याच बरोबर MH01 BT7115 हा टॅक्सी नंबर देत यातून प्रवास न करण्याचे आवाहनही तिने वाचकांना केले आहे. यानंतर तिने एफआयआर दाखल केली असून त्या टॅक्सीचालकास पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

डेबलीनाने स्पष्ट केले की आरोपीला लाजिरवाणे वाटावे किंवा धडा शिकवावा या हेतूने हि माहिती पोस्ट करत नसून महिलांनी आपल्याविरोधात घडणाऱ्या अशा घटनांविरोधात आवाज उठवावा यासाठी त्यांना प्रेरीत करण्याचा हेतू असल्याचे तिने सांगितले.

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

‘वंचित’मुळे राहूल गांधींची कॉंग्रेस नेत्यांवर ‘आगपाखड’