धक्‍कादायक ! निर्दोष सुटणार असल्याच्या रागातून कैद्याचा खून

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी निर्दोष सुटणार असल्याच्या रागातून एका कैद्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनिल मारुती माने (वय-३५ रा. नातेपुते, ता. माळशिरस) याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. कैदी परमेश्वर उर्व देवा नानासाहेब जाधव (वय-२४ रा. कोडेगाव, ता. माळशिरस) याने गुन्ह्याची कबुली दिली असून सुनिल माने याने नात्यातील मुलीवर सामूहिक अत्याचार केला होता. तो निर्दोष सुटणार असल्यामुळे त्याचा खून केल्याचे जाधव याने सांगितले. आरोपी जाधव याला न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी जाधव याच्या नात्यातील मुलीवर ९ डिसेंबर २०१८ रोजी सामुहिक अत्याचार करण्यात आले होते. याप्रकरणात सुनिल माने याच्यावर नातेपुते पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात असून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. तर याच कारागृहात आरोपी जाधव हा मोक्काच्या गुन्ह्यात आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी दोन्ही बाजूंनी तयारी सुरु केली होती. मात्र, अत्याचार करून माने खुलेआम गावात फिरणार हे जाधव याच्या बुद्धीला पटले नाही. त्यामुळे त्याने मानेचा खून केला असल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

शांत डोक्याने काढला काटा
आरोपी आणि मयत हे दोघे एकाच कारागृहात कैदी होते. आरोपीने माने याच्याबरोबर चांगले वर्तन करून त्याच्यासोबत सलोखा निर्माण केला. हे दोघे सकाळ आणि संध्याकाळ होणाऱ्या प्रार्थनेला हजर राहत होते. माने याचा खून करण्यासाठी आरोपी जाधव याने दगड हेरून ठेवला होता. त्याने अत्यंत नियोजनबद्ध आणि शांत डोक्याने मानेचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

You might also like