महावितरण कडून रक्तदान शिबीर, 63 बाटल्याचं ‘संकलन’

लोणी काळभोर :पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुळशी विभाग अंतर्गत येणाऱ्या  वाघोली उपविभागातील विज कर्मचार्यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यात 63 कर्मचार्यांनी रक्तदान केले. हे संकलित झालेले रक्त ससून रुग्णालयातील रक्तपेढीला देण्यात आले.

अनेकवेळा अपघात, शस्त्रक्रिया अशावेळी तातडीने रक्ताची आवश्यकता असते. धावपळीच्या युगात केंव्हा कधी कसला बाका प्रसंग बेतेल याची कल्पना नसते.त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी एक सामाजिक जबाबदारी ओळखून रक्तदानासाठी पुढ आले पाहिजे असे महावितरणचे अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी प्रतिपादन केले.

विज कर्मचारी नागरिकांना चांगली व तत्पर सेवा देण्यासाठी चोवीस कार्यास असतात. यातही आपण समाजाचा एक भाग असून काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये महावितरणच्या 63 कर्मचार्यांनी रक्तदान केले.

यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता तालावर, मुळशी विभाग प्रमुख रविंद्सिंह बुंदेले उप कार्यकारी अभियंता भरते तसेच उरुळी कांचन येथील सुरवसे वाघोलीचे सहाय्यक अभियंता गणेश श्रीखंडे तसेच या विभागातील सर्व कर्मचारी सहभागी झाला होते.

Visit : Policenama.com