Blood Donation Camp In Pune | शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन तर्फे 20 मार्च रोजी रक्तदान शिबीर

पुणे : Blood Donation Camp In Pune | शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन (Martyr Captain Sushant Godbole Foundation) व सर परशुरामभाऊ महाविद्यालय (SP College Pune) यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.सर परशुरामभाऊ महाविद्यालय (एस.पी. कॉलेज) येथे ,सोमवार २० मार्च २०२३ सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे रक्तदान शिबीर होणार आहे. (Blood Donation Camp In Pune)

या शिबिरात संकलित होणारे रक्त आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज (ए एफ एम सी ) ला दिले जाणार आहे.आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, स. प. जिमखाना, एनसीसी, एनएसएस चा सहभाग या शिबिरात असणार आहे. फाऊंडेशनच्या संस्थापक गीता गोडबोले यांनी ही माहिती दिली . शहीद दिना निमित्त हे शिबीर आयोजित केले जात आहे.भाजपाचे संघटन सचिव राजेश पांडे (Rajesh Pandey Bjp) हेही उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक उपक्रमातून वीरांचे स्मरण

इ.स. २००३ साली वयाच्या २३ व्या वर्षी कॅप्टन सुशांत यांना ऑपरेशन पराक्रम दरम्यान जम्मू येथे वीरमरण आले .
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम करण्यासाठी त्यांच्या मातोश्री गीता गोडबोले यांनी ‘ शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन ‘ स्थापन केले आहे.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह,
राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती.
त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस ‘शहीद दिवस’ (Shahid diwas) म्हणून साजरा केला जात असतो.

Web Title :- Blood Donation Camp In Pune | Blood donation camp on March 20 by Martyr Captain Sushant Godbole Foundation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Unseasonal Rain In Maharashtra | शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Crime News | सरंक्षण खात्यातील ग्राहकांच्या नावे ४६ कार्सची केली परस्पर विक्री; खडकीच्या सी एस डी डेपोच्या नावाने बनावट धनादेश देऊन केली कोट्यवधींची फसवणूक

Mumbai- Pune Expressway Accident | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, कारची ट्रकला मागून धडक; तिघांचा जागीच मृत्यू