नीरा : पाडेगांव येथे रक्तदान शिबिरात 83 जणांनी केले रक्तदान

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन – नीरा नजिक पाडेगांव फार्म (ता.फलटण) येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर युवा मंच व अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने व युवा मंंचचेे अध्यक्ष राजेश खरात , पाडेगांवच्या सरपंच स्मिता खरात व पाडेगाव पंचक्रोशीतील तरूण मंडळाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ८३ रक्तदात्यांंनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिराचे उद्घघाटन सातारा जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपक चव्हाण होते. या वेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर , श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक भाऊसाहेब कापसे, कापडगावचे माजी सरपंच प्रविण खताळ, मिरेवाडीचे सरपंच दिपक नरूटे, बाळासाहेब ठोंबरे, माणिकराव शेळके, पाडेगावचे सर्व पदाधिकारी ,ग्रामस्थ व तरूण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात ८३ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवहितार्थ कार्य केले. या शिबिराला पाडेगांंव ग्रामस्थ व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बहुमोल सहकार्य लाभले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पाडेगांंवमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दिपक चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर युवा मंचचे अध्यक्ष राजेश खरात यांनी आभार मानले.

मोहंम्मदगौस आतार
पत्रकार, नीरा जि.पुणे.