जेजुरीत श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने रक्तदान शिबीर

जेजुरी : जेजुरी मधील श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने आणि ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ,विश्वस्त व कर्मचारी ,ग्रामस्थांनी सहभाग घेत रक्तदान केले.

सहधर्मादाय आयुक्त दिलीपराव देशमुख यांच्या सुचनेनुसार देवसंस्थानच्या वतीने बुधवारी (दि.३) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शिबिराचे उदघाटन प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी केले . यावेळी विश्वस्त ऍड. अशोक संकपाळ ,सॉलि. प्रसाद शिंदे ,राजकुमार लोढा ,पंकज निकुडे, शिवराज झगडे, तुषार सहाने, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते . विश्वस्तांसह यांच्यासह ३६कर्मचारी व ग्रामस्थांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेत सुमारे ५० बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले.संकलित झालेले रक्त ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीत जमा करण्यात आले आहे.

कोविड १९ “महामारी” विरुद्ध च्या लढाईत देवसंस्थानच्या वतीने गेली तीन महिन्यापासून विविध उपक्रम राबविण्यात आले असून ससून रुग्णालयाच्या आयसोल्यूशन वार्ड निर्मितीसाठी ५१लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला होता . तसेच आवश्यक तेथे जंतूनाशक औषध फवारणी ,पीपीई किट ,मास्क,सॅनिटायझर वाटप , पुरंदर , हवेली , शिरूर, सातारा, भोर , पुणे शहरातील काही भागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, दोन महिने जेजुरी शहर व औद्योगिक वसाहती मधील कामगार व गरजूंना अन्नसेवा पुरवणे, रस्ते सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाला मदत आदी उपक्रम गेली अडीच महिन्यापासून सुरू आहेत .

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like