लग्नमंडपात नवरदेवासह २२ वऱ्हाडींनी केले रक्तदान

अहमदनगर: पोलिसनामा ऑनलाईन – दुष्काळी परिस्थितीत परिवर्तनाच्या चळवळीला गती देणारा एक विवाह सोहळा जामखेड शहरात पाहायला मिळाला. हे लग्न एक खास चर्चेचा विषय झालाय. कारणही तसेच आहे. चांगदेव व धनश्री या जोडप्याचं लग्न एकमेवाद्वीतीय ठरलंस ते वेगळ्याच कारणासाठी. माणुसकीचा संदेश देत, यांच्या लग्नात रक्तदान,अवयव दान शिबिराचं आयोजन करण्यातत आलं होतं.स्वत नवरदेव नवरीनेही अवयवदानाचा संकल्प केला यावेळी आलेल्या २२ वऱ्हाडी मंडळींनी रक्तदान करुन आलेल्या ९०० वऱ्हाडी मंडळीना विविध पुस्तके भेट म्हणून देऊन कुटुंबीयांनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला.

लग्न म्हटले की, खर्चिक कार्यक्रमाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, भरमसाठ खर्च न करता समाजउपयोगी उपक्रम राबवून नवरदेव चांगदेव गीते यांनी हा नवा पायंडा पाडला.लग्नपत्रिकेतही गीते यांनी आलेल्या आहेरातून उसतोड मजुरांच्या मुलासाठी वाचनालय चालू करणार असून लग्नसोहळ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचा संदेश दिला या प्रेरणादायी आवाहनाचे सर्वत्र कौतुक झाले त्यांनी आपल्या विवाहप्रसंगी रक्तदान, अवयव दान यासह विविध समाजिक उपक्रम राबवून एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला. सध्या या विवाहाची राज्यात चर्चा होत आहे. पाटोदा येथील गौतम बापूराव गीते याचा चिरंजीव चांगदेव यांचा विवाह भूम येथील एकनाथ सटबाजी नागरगोजे यांनी कन्या धनश्री हिच्याशी शनिवारी दि ३० रोजी जामखेड येथील मिहीर मंगल कार्यालयात दुपारी थाटामाटात झाला. राजकीय व इतर सर्वच क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला हजर होते.

सध्या सर्वत्र तीव्र दुष्काळाची परिस्थिती पाहता लग्नात पैशांची होणारी उधळपट्टी, बिनकामाचा फाजील खर्च,नेत्यांना बळच बोलावून केले जाणारे शक्तिप्रदर्शन,नको तितके फेटे, या सर्व फाजील गोष्टींना फाटा देत न समाजपयोगी उपक्रम हाती घेत एम फार्म शिक्षण झालेले चांगदेव गीते व बी ए झालेली धनश्री नागरगोजे या उच्चशिक्षित दाम्पत्यांनी लग्न सोहळ्यामध्ये आपण रक्तदान शिबिर ठेवून रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे प्रबोधन करू अशी कल्पना दोघांनीही घरच्यांसमोर मांडली. कुटुंबातील सर्वांनाच हा संकल्प आवडल्याने रक्तदान शिबिराने नियोजन पक्के झाले त्यानंतर दि ३० रोजी लग्न सोहळ्यात सर्वात प्रथम स्वतः नवरदेव चांगदेव गीते यांनी रक्तदान करून याचा शुभारंभ केला. आणि पाठोपाठ लग्नासाठी आलेल्या काही वऱ्हाडी मंडळीना हा उपक्रम आवडला अन त्यामुळे २ तासांत २२ रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या. रक्तदान शिबिरासाठी आलेल्या बीड ब्लड बँकेच्या तंत्रज्ञानीही लग्नाच्या ठिकाणी रक्तदान शिबिर हा उपक्रम आपण पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगीतले.

नवरदेव नवरीच्या ह्याच भूमिकेमुळे, हे रक्तदान शिबिर पार पडलं त्याचबरोबर अवयव दान यासह विविध समाजिक उपक्रम राबवून एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला. यावेळी चागदेव व धनश्री यांनी स्वत अवयवदानाचा संकल्प करून फोर्म भरून दिला त्याचा पाठोपाठ आलेल्या २६ पाहुणे मंडळींनीही फोर्म भरून दिले ,यांच्या उपक्रमाला लक्ष्मण सस्ते, दत्ता हुले, दत्ता देशमाने, जाधव सर, महेश बेदरे, नानासाहेब दिडुळ, डॉ. रवी गोरे प्रमोद सानप जामखेड केमिस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष माउली गायकवाड़ यांचे विशेष सहकार्य लाभले, “मला रक्तदानाचं महत्त्व माहिती आहे. वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे अनेकांना जीवाला मुकावं लागतं. हीच गोष्ट ध्यानात घेऊन, रक्तदानासंबंधीच्या जागृतीसाठी मला एक आदर्श निर्माण करायचा होता त्यामुळे वायफाट खर्चाला फाटा देत लग्नामध्ये रक्तदान शिबीर घेतले.” असे चागदेव गीते नवरदेव यांनी सांगितले.

“चागदेव यांनी ही कल्पना सांगितल्यावर मी लगेचच हो म्हणाले. अशाप्रकारचा पुढाकार घेतल्यबद्दल मला खूप अभिमान वाटतोय. मला आशा आहे की, अनेक लग्नांमध्ये अशा सामाजिक उपक्रमाचे अनुकरण करण्यात येईल. ” असे धनश्री गीते नववधू यांनी सांगितले.