COVID-19 : ‘या’ ब्लड ग्रुपला ‘कोरोना’चा सर्वाधिक धोका, श्वास घेण्यास होतो त्रास, संशोधनातील दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 66 लाख लोकांना आपल्या विळख्यात जखडले आहे. या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत किमान 3 लाख 89 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. सामान्यतः कोरोना रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. नंतर या कारणामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की कोणत्या रुग्णाला श्वास घेण्यात अधिक त्रास होईल आणि कोणत्या रुग्णास कमी हे रूग्णांच्या रक्तगटावर अवलंबून असते.

संशोधानातून दावा
इटली आणि स्पेनच्या  हॉटस्पॉट्स क्षेत्रातील सुमारे 1600 रूग्णांवर संशोधन केले गेले. त्याअंतर्गत असे आढळून आले की कोरोना संसर्ग झाल्यास ‘ए’ पॉझिटिव्ह ग्रुपच्या रूग्णांना श्वास घेण्यात अधिक त्रास होतो. तर ‘ओ’ पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये हा धोका कमी असतो. जनुकांच्या आधारे डॉक्टरांनी संशोधन केले. बहुतेक रुग्णांचा श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे मृत्यू होतो.

रक्तगटावर झाले बरेच संशोधन
संशोधनादरम्यान संशोधकांनी 2205 अशा रक्त नमुन्यांचे विश्लेषण देखील केले जे कोरोनाने संक्रमित नव्हते. तथापि रक्तगटाविषयी अधिक संशोधन चालू आहे. याआधी चीनच्या वुहान आणि शेन्झेन येथे कोरोना विषाणूची लागण झालेल्या 2173 रुग्णांवर केलेल्या अभ्यासानुसार या रुग्णांमध्ये रक्तगट ‘ए’ असणाऱ्यांची संख्या जास्त आढळून आली आहे. ‘ओ’ रक्तगटाच्या लोकांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका ‘ए’ च्या तुलनेत खूपच कमी असल्याचे दिसून आले आहे.

कोणत्या टप्प्यात आहे कोरोना लस
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांवर कोणताही इलाज नाही. 100 हून अधिक कंपन्या सध्या कोरोना लस तयार करत आहेत. पण आतापर्यंत कोणालाही ठोस यश मिळालेले नाही. दरम्यान, दोन कंपन्यांनी चांगली बातमी दिली आहे आणि दावा केला आहे की सुरुवातीच्या काळात त्यांची लस प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. अमेरिकेतील एका कंपनीची चाचणी दुसर्‍या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. तर चीनी कंपनी सिनोव्हॅक बायोटेक दावा करते की त्यांची लस 99 टक्के प्रभावी आहे. सध्या या लसींना अजून बरेच टप्पे पार करावे लागतील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like