Blood Sugar And Cholesterol Level | डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉलची समस्या करू शकते ‘ही’ एक गोष्ट, डाएटमध्ये करा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Blood Sugar And Cholesterol Level | सध्याच्या काळात मधुमेहाची समस्या (Diabetes) झपाट्याने वाढत आहे. मधुमेह वाढण्यामागे लठ्ठपणा (Obesity) हे प्रमुख कारण मानले जाते. तहान लागणे, थकवा येणे आणि वारंवार लघवी होणे (Thirst, Fatigue And Frequent Urination) ही मधुमेहाची मुख्य लक्षणे (Symptoms Of Diabetes) आहेत. जेव्हा मधुमेहाची समस्या असते तेव्हा शरीरात ब्लड शुगर (Blood Sugar) लेव्हल वाढू लागते. अशावेळी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात (Blood Sugar Level Control) ठेवणे आवश्यक आहे. (Blood Sugar And Cholesterol Level)

 

जेव्हा मधुमेह होतो तेव्हा शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढू लागते. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपल्या शरीराला त्यातून ग्लुकोज (Glucose) मिळते. या ग्लुकोजचा वापर पेशी शरीराला ऊर्जा देण्यासाठी करतात. शरीरात इन्सुलिन नसेल तर पेशी आपले काम नीट करू शकत नाही. त्यामुळे पेशींना ग्लुकोज मिळत नाही.

 

हे ग्लुकोज आपल्या रक्तात जमा होऊ लागते. हे टाळण्यासाठी ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) कशी नियंत्रित ठेवता येईल याबाबत जाणून घेवूयात…

 

अबराका येथील डेल्टा स्टेट युनिव्हर्सिटीचे मुख्य संशोधक अँथनी ओजिह (Anthony Ojih, lead researcher at Delta State University in Abraka) यांनी सांगितले की, कांदे अतिशय स्वस्त असतात, आणि सहज मिळतात. कांद्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, ज्याचा उपयोग मधुमेहाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. प्राण्यांवरील अभ्यासात कांद्याच्या रसाच्या वेगवेगळ्या डोसचे मधुमेही उंदरांच्या तीन वेगवेगळ्या गटांवर होणारे परिणाम जाणून घेण्यात आले. (Blood Sugar And Cholesterol Level)

 

यामध्ये उंदरांना (Rat) दररोज 400 आणि 600 एमजी/केजी कांद्याचा रस (Onion Juice) दिला जात होता. तो सेवन केल्यानंतर उंदरांची ब्लड शुगर लेव्हल तपासली असता ब्लड शुगर लेव्हल 50 ते 35 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले.

ओजिह यांनी स्पष्ट केले की, आम्ही तंत्राची तपासणी केली ज्याद्वारे कांदे ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकतील, परंतु अद्याप आमच्याकडे याचे स्पष्टीकरण नाही. क्वेंन्सेटिन आणि सल्फर ब्लड शुगर लेव्हल कमी करते. या दोन्हीमध्ये मधुमेह कमी करण्याचे गुणधर्म आहेत. क्वेंन्सेटिन, जे फ्लेव्होनॉइड आहे, संपूर्ण शरीरात ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करते.

 

करंट मेडिसिनल केमिस्ट्री जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका वैद्यकीय पेपरमध्ये स्पष्ट केले आहे की फ्लेव्होनॉइड्स हा पॉलीफेनॉलचा एक मोठा समूह आहे जो मानवी आहारात मोठ्या प्रमाणात उपस्थित असतो.

 

क्वेन्सेटिनमध्ये आढळणार्‍या अँटी-ऑक्सिडंट (Anti Accident) आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे,
असे मानले जाते की ते मधुमेहासह अनेक रोगांवर उपचार करू शकते. अभ्यासात असेही दिसून आले की,
क्वेंन्सेटिन आणि सल्फर कोलेस्टेरॉलची लेव्हल नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.

 

याशिवाय असेही आढळून आले आहे की भाज्यांमध्ये असलेले अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म (Anti-Inflammatory Properties)
हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) कमी करण्यास आणि ब्लड क्लॉटींगपासून (Blood Clotting)
संरक्षण करण्यास देखील मदत करतात.
अशा स्थितीत उच्च कोलेस्ट्रॉलच्या (High Cholesterol) रुग्णांसाठी कांद्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते.

 

या सर्व गुणांमुळे कांदा (Onion) हृदयरोगी आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि पक्षाघात (Paralysis)
यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (Vascular) रोगांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar And Cholesterol Level | diabetes this thing can reduce blood sugar and cholesterol level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP Mohit Kamboj | भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल; नवाब मलिकांच्या अटकेनंतर केलेलं कृत्य पडलं महागात

 

Nawab Malik | ‘फडणवीस दाम्पत्यांविरुद्ध 3 वर्षापूर्वीच ईडीकडे तक्रार, पण अद्याप…’

 

Pune Crime | पत्नीला नांदविण्यासाठी आणायला गेलेल्या पतीला मेव्हण्यांनी केली बेदम मारहाण; खडकीतील अ‍ॅम्युनेशन फॅक्टरी परिसरातील घटना