Blood Sugar And High BP | ‘ब्लड शुगर’सोबतच हाय BP सुद्धा कंट्रोल करते काजू, जाणून घ्या इतर फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar And High BP | काजू हा एक प्रकारचा ड्राय फ्रूट आहे, हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय ड्राय फ्रूट (Dry Fruits Benefits) आहे. जे खायला चविष्ट तर आहेच पण अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर ठेवण्यासही मदत करते. काजूचा (Cashew) वापर खीर, हलवा आणि बर्फी इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काजूमध्ये प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्स भरपूर असतातच, तसेच त्यामध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. (Blood Sugar And High BP)

 

ब्लड शुगरवर नियंत्रण (Blood Sugar Control) ठेवण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत काजू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. काजूमध्ये खनिजे, लोह, फायबर, फोलेट, अँटीऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. (Blood Sugar And High BP)

जाणून घेऊया काजू खाण्याचे फायदे (Cashew Benefits) –

1. ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) :
2019 मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात मधुमेहाच्या रुग्णांसाठीही काजू फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. टाईप-2 मधुमेहाचे रुग्ण त्यांच्या आहारात काजूचा समावेश करू शकतात. काजू खाल्ल्याने शरीरात इन्सुलिनची पातळी कायम राहते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. (Blood Sugar And High BP)

 

2. ब्लड प्रेशर (Blood Pressure) :
बदाम, शेंगदाणे आणि अक्रोड यासारख्या इतर ड्रायफ्रुटपेक्षा काजूमध्ये कॅलरी आणि फॅट कमी असते. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी काजूचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कारण काजू शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी (फॅटचा एक प्रकार, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो) कमी होतो. नाश्त्यामध्ये भाजलेले काजू खावू शकता.

 

3. बुद्धी तीक्ष्ण करा (Sharpen The Intellect)
काजू लोह, मॅग्नेशियम आणि झिंकचा चांगला स्रोत आहे. काजूमध्ये आढळणारे सॅच्युरेटेड, मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स चांगले फॅट मानले जाते.
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट हृदयासाठी चांगले असते. त्यामुळे काजू खाणार्‍यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो.

 

काजूमध्ये आढळणारे लोह पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते, ज्यामुळे अ‍ॅनिमिया थांबतो.
मॅग्नेशियम स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते आणि वयानुसार स्मरणशक्ती कमी होण्यास प्रतिबंध करते.

 

Web Title :- Blood Sugar And High BP | blood sugar cashew also controls high bp cholesterol level you should know more benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

31st Celebration Night Rules | 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून नवीन आदेश जारी; पार्ट्यांना रात्री 12 पर्यंतच परवानगी

Ranveer Singh-Deepika Padukone | रणवीरनं विमानतळावरच केलं दीपिकाला KISS, व्हिडिओ झाला व्हायरल

Twinkle Khanna | ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत ! ती म्हणाली – ‘मी अपराधीपणाने जगत आहे’