Blood Sugar | डायबिटीजच्या रूग्णांसाठी लाभदायक ठरू शकते केळी! परंतु खाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात लाखो लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेह हा असाध्य आजार आहे, परंतु रुग्ण आपला आहार आणि जीवनशैलीत (Diet And Lifestyle) बदल करून वाढत्या ब्लड शुगरवर (Blood Sugar) नियंत्रण ठेवू शकतो. मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांच्या मनात आहारा संबंधी अनेक प्रश्न असतात की त्यांच्यासाठी कोणता पदार्थ फायदेशीर ठरू शकतो (Blood Sugar).

 

वास्तविक, मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांना ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. सामान्यतः असे मानले जाते की मधुमेहींनी फळे (Fruits) खाऊ नयेत कारण त्यात फ्रक्टोज (Fructose) ही नैसर्गिक साखर असते.

 

असाच विश्वास सामान्यतः केळ्यांबाबत असतो, पण तुम्हाला माहिती आहे का की केळीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी (Blood Sugar) फायदेशीर ठरू शकते? जाणून घेऊया –

 

डायबिटिस असेल तर केळी खावीत का (Should You Eat Banana If You Have Diabetes) ?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते केळीमध्ये साखर (Sugar) आणि कार्ब्ज (Carbs) आढळतात. याशिवाय, केळीमध्ये भरपूर फायबर (Fiber) देखील आढळते आणि त्याच वेळी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) कमी असतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मधुमेहाचे रुग्ण केळीचे सेवन करू शकतात परंतु ते जास्त प्रमाणात सेवन करू नये.

 

त्यांनी आठवड्यातून दोन किंवा तीनपेक्षा जास्त केळी खाऊ नयेत. हाय ब्लड शुगर (High Blood Sugar) असलेल्या रुग्णांनी पिकलेली केळी खाण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

मधुमेहाचे जाणकार सल्लागार डॉक्टर सुनीत सिंग (Dr. Suneet Singh) यांनी सांगितले की, कच्च्या केळ्याला व्हिटॅमिनचे पॉवर हाऊस म्हटले जाते. पोटॅशियम (Potassium) व्यतिरिक्त, कच्च्या केळ्यामध्ये अनेक व्हिटॅमिन (Vitamins) आणि मिनरल (Minerals) देखील असतात. त्यातील काही पौष्टिक घटक व्हिटॅमिन सी, बी6 (Vitamin C, B6) आहेत.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या केळ्याचे सेवन केल्याने आयर्न (Iron) आणि फोलेटसारखी (Folate) व्हिटॅमिन मिळतात,
तसेच ही सर्व व्हिटॅमिन शोषून घेण्यातही केळी फायदेशीर आहे.

 

डॉ सुनीत यांनी सांगितले की, जर तुम्हाला मधुमेह असेल तर कच्ची केळी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात,
कारण त्यात साखरेची पातळी देखील कमी असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील 30 आहे. 50 पेक्षा कमी
जीआय असलेले पदार्थ सहज पचतात आणि ब्लड शुगर लेव्हल देखील यामुळे नियंत्रित होते.

 

एका संशोधनानुसार, एका मध्यम कच्च्या केळीमध्ये दैनंदिन गरजेच्या 130 कॅलरीज, व्हिटॅमिन बी6 (42.31%), कार्बोहायड्रेट (26.35%),
मँगनीज (17.61%), व्हिटॅमिन सी (14.56%) आणि आयर्न (13.00%) असते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar | blood sugar banana can be beneficial for diabetic patients but keep this one thing in mind before eating

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Remedy For Joint Pain | सांधे दुखीवर ‘ही’ पाने आहेत रामबाण उपाय, वाचा सविस्तर

 

The Effects Of Smoking | स्मोकिंग केल्याने शरीरावर होतात ‘हे’ परिणाम; जाणून घ्या

 

Diabetes Symptoms | टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीजमध्ये काय आहे अंतर? जाणून घ्या त्याची लक्षणे कशी ओळखावीत