Blood Sugar | डायबिटीजच्या रूग्णांनी खाऊ नये मध? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar | आजकाल मधुमेह (Diabetes) ही एक मोठी समस्या आहे. मधुमेह असलेल्या लोकांना गोड पदार्थ आणि पेयांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण गोड पदार्थ खाल्ल्याने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढू शकते. पण मधुमेहींसाठी साखरेला मध (Honey) हा आरोग्यदायी पर्याय असू शकतो का? मधुमेही रुग्ण मध खाऊ शकतात का? जर तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर याबाबत जाणून घेऊया. (Blood Sugar)

 

मधुमेह असलेल्या रुग्णांनी कार्बोहायड्रेट आणि साखरेचे सेवन नियंत्रित करणे आवश्यक आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की रुग्णांनी गोड पूर्णपणे वर्ज्य करावे.

 

रुग्णांसाठी मर्यादित प्रमाणात मध सेवन करणे सुरक्षित असून मधातील अ‍ॅन्टी इम्फ्लामेटरी गुणधर्मामुळे मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत कमी करण्यास मदत होते. (Blood Sugar)

 

मधाचे सेवन :
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रिफईंड साखर, उसाची साखर किंवा पावडरची साखर यांसारख्या साखरेऐवजी मध वापरणे हा आरोग्यदायी पर्याय असू शकतो. पण लक्षात ठेवा की बाजारात अनेक कंपन्यांचे मध विकले जातात जे पूर्णपणे शुद्ध नसतात आणि त्यात साखर किंवा इतर शुगर सिरपची भेसळ असते. म्हणून, मध खरेदी करताना किंवा सेवन करताना शुद्धता तपासा.

मधुमेहामध्ये मध सेवन करणे सुरक्षित आहे का?
मधुमेहामध्ये मधाच्या सेवनाबाबत अनेक अभ्यासानुसार, शुद्ध मधाचे सेवन साखर आणि इतर गोड पदार्थांपेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स (glycaemic index) कमी असतो. मात्र, मधात कॅलरीज जास्त असतात आणि साखरेपेक्षा गोड आहे.

 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधासाठी साखरेपेक्षा कमी इन्सुलिन लागते.
मधाच्या या गुणधर्माच्या आधारे असे मानले जाते की मधुमेहाचा त्रास असलेले लोक मध कमी आणि मर्यादित प्रमाणात सेवन करू शकतात.

 

(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar | blood sugar diabetes patients should not eat honey know its advantages and disadvantages

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

TET Exam Scam | पुणे सायबर पोलिसांकडून IAS अधिकारी सुशील खोडवेकरला अटक; शिक्षक भरती घोटाळ्यातील सहभाग समोर आल्यानं कारवाई

Ajit Pawar | पुण्यातील शाळा-महाविद्यालयांबाबत अजित पवारांची महत्वाची माहिती; म्हणाले…

Sitaram Kunte | ईडी चौकशीदरम्यान माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेंचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, म्हणाले -‘अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची…’