Blood Sugar | डायबिटीजच्या रूग्णांनी नाश्त्यात खाऊ नयेत ‘हे’ पदार्थ, वाढू शकते ब्लड शुगर; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar | मधुमेहाने (Diabetes) त्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहाराबरोबरच जीवनशैलीतही बदल करणे आवश्यक आहे. मधुमेह हा असाध्य आजार आहे, पण आपल्या आहारात आणि जीवनशैलीत (Diet And Lifestyle) बदल करून ब्लड शुगर (Blood Sugar) नियंत्रणात ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांनी (Diabetes Patients) त्यांच्या आहारात फळे आणि भाज्यांच्या (Fruits And Vegetables) निवडीबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

 

मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या सकाळच्या नाश्त्यासह रात्रीच्या जेवणाचा चार्ट बनवावा, कारण मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अनेक गोष्टी टाळल्या पाहिजेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, असे अनेक पदार्थ आहेत जे ब्लड शुगर (Blood Sugar) झपाट्याने वाढवू शकतात.

 

त्यामुळे मधुमेहाने त्रस्त असलेल्यांनी नाश्त्यात सकस पदार्थ घ्यावेत जेणेकरून त्यांची ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) सामान्य राहील. अशा स्थितीत रुग्णांनी नाश्त्यात काय खाऊ नये आणि काय टाळावे ते जाणून घेऊया –

सकाळची सुरुवात (Morning Routine) :
आचार्य श्री बाळकृष्ण यांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळची सुरुवात अर्धा चमचा मेथी पावडर (Fenugreek Powder) ग्लासभर पाण्यात टाकून करावी. तसेच एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवलेले बार्ली (Barley) गाळून सकाळी प्यावे. एक तासानंतर, रुग्णाने शुगर फ्री चहा आणि विना साखरेची बिस्किटे (Sugar-Free Tea And Sugar-Free Biscuit) खावीत.

 

हे सेवन करा (Eat This) :
टाईप-2 मधुमेहाच्या रुग्णांनी (Type-2 Diabetes Patients) नाश्त्यात बदाम (Almond) खावे, कारण यामुळे त्यांचे ग्लायसेमिक नियंत्रणात राहते. बदाम लिपिड प्रोफाईल राखण्यास मदत करतो. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांनी हंगामी फळांचे सेवन (Consumption Of Seasonal Fruits) करावे. याशिवाय गोड फळांचे सेवन कमी करणे चांगले.

चुकूनही याचे सेवन करू नका (Don’t Eat It By Mistake) :
मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात कोणत्याही प्रकारचा ज्यूस पिऊ नये. याशिवाय चहा, कॉफी, चॉकलेट्स, पेस्ट्री, प्रक्रिया केलेले पदार्थ (Tea, Coffee, Chocolates, Pastries, Processed Foods) यांचा समावेश करू नये.

 

याशिवाय नाश्त्यात मैद्यापासून बनवलेला ब्रेडही टाळावा.
आरोग्य तज्ञांच्या मते, मधुमेह असलेले लोक त्यांच्या खाण्याच्या सवयी सुधारून ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करू शकतात.

वयानुसार साखरेची पातळी किती असावी (Sugar Level According To Age) ?
जर मधुमेही रुग्णांचे वय 40-50 वर्षे असेल, तर उपवास ब्लड शुगर लेव्हल 90 ते 130 mg/dL असू शकते.
त्याच वेळी, दुपारच्या जेवणानंतर ब्लड शुगर लेव्हल 140 mg/dL पेक्षा कमी असावी.
त्याच वेळी, रात्रीच्या जेवणानंतर, ब्लड शुगर लेव्हल 150 mg/dL सामान्य श्रेणीत येते.
त्याचप्रमाणे, 50-60 वर्षे वयोगटातील, उपवासातील ब्लड शुगर लेव्हल 90 ते 130 mg/dL असावी.

 

साखरे ऐवजी गूळ खाऊ शकतो का (Eat Jaggery Instead Of Sugar)?
काही आरोग्य तज्ञांच्या मते साखरेच्या जागी गुळाचा वापर मर्यादित प्रमाणात करता येतो. तर आयुर्वेदानुसार मधुमेहाच्या रुग्णांनी गूळ खाऊ नये.
फुफ्फुसाचा संसर्ग, घसा खवखवणे, मायग्रेन आणि अस्थमाच्या (Lung Infections, Sore Throat, Migraine And Asthma)
समस्येत गूळ खाऊ शकता, पण मधुमेहाच्या समस्येत गूळ खाऊ नये.

 

Web Title :- Blood Sugar | blood sugar diabetic patients should not eat these foods in breakfast can increase blood sugar

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Green Sprouted And Shrunken Potatoes | ‘या’ रंगाचे बटाटे अजिबात खाऊ नका, अन्यथा कॅन्सरचा धोका

 

Heart Attack Signs | हार्ट अटॅकपूर्वी दिसतात ‘हे’ 6 संकेत, कधीही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

 

Hormonal Imbalance | जर अचानक वजन कमी होत असेल तर हार्मोनल बदल होऊ शकतो, जाणून घ्या लक्षणे आणि ते कसे टाळावे