Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – साखर (Sugar), मैदा (Flour) आणि मॅग्गी (Maggi) यासारख्या गोष्टी ह्या ब्लड शुगर (Blood Sugar) असणाऱ्या लोकांसाठी स्लो Poison (अत्यंत घातक) समान आहेत. पुढे जाऊन त्या गोष्टी आपल्या शरीराला नुकसान पोहचवू शकतात. (Blood Sugar)

 

मधुमेह (Diabetes) हा आता एक किरकोळ आजार होत चालला आहे. मधुमेह झाल्यानंतर माणसाची जीवनशैलीच (LifeStyle) बदलून जाते. अशा वेळी रुग्णांनी काय खावे? हे त्यांचा लक्षात येत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पौष्टिक आहार (Nutritious Diet) घेतल्यानंतर माध्यमेहासारख्या आजारांवर नियंत्रण (Blood Sugar Control) आणले जाऊ शकते.

 

ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी नेमके काय खावे?
अपोलो हॉस्पिटलच्या डॉ. बी.के.रॉय (Dr. B. K. Roy, Apollo Hospital) ह्यांच्या माहितीनुसार ब्लड शुगरला (Blood Sugar) नियंत्रित कारण्यासाठी रिफाइन कार्ब्स (Refined Carbs) हे बंद करावेत लागतील. रिफाईन कार्ब्स हे मधूमेहाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. जसे की मॅग्गी, साखर हे पदार्थ ग्लाइसेमिक इंडेक्स (Glycemic Index) असणारे आहेत. ह्या पदार्थांमध्ये कुठल्याही प्रकारचे फायबर (Fiber) अथवा फॅट (Fats) नसते आणि प्रोटीनचे (Protein) प्रमाण देखील खूप कमी असते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी ह्या पदार्थांचे सेवन करावे.

 

कोणत्या गोष्टी खाव्यात..

हिरव्या पालेभाज्या (Green Vegetables) –
हिरव्या पालेभाज्यांमध्ये कार्बोहायड्रेट (Carbohydrates) आणि कॅलरीचे (Calories) प्रमाण कमी असते. आणि फायबरचे प्रमाण जास्त, जे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते. यामध्ये पालक, मेथी, कोबी, भेंडी आणि शेवग्याची पाने यांचा वापर करावा.

जांभूळ (Java Plum) –
जांभूळ आणि जांभळाची पाने हि मधुमेहाच्या लोकांसाठी खूप फायद्याची असतात. जांभूळ हे ग्लाइसेमिक इंडेक्स पदार्थ आहे त्यासोबतच ह्यामध्ये अ‍ॅन्टी ऑक्सीडेंट चे प्रमाण सुद्धा जास्त आहे. ब्लड शुगर (Blood Sugar) असणाऱ्या लोकांमध्ये ऑक्सीडेटिव स्ट्रेस खूप असते. जांभूळ ते कमी करण्यात उपायकारक आहे.

 

Whole Grains –
रिफाइन ग्रेनच्या (Refined Grains) तुलनेत होल ग्रेन हे मधुमेहाच्या लोकांसाठी फायद्याचे असतात.
होल ग्रेनमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असते व त्यामध्ये ज्वारी, बाजरी, ब्राउन राईस, नाचणी इत्यादी पदार्थ घेऊ शकतो.

 

प्रोटीन (Protein) –
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारात कार्बोहाइड्रेडचे प्रमाण कमी आणि प्रोटीन चे प्रमाण जास्त ठेवायला हवे.
प्रोटीन आहारामध्ये घेतल्याने कोलेस्ट्रॉल (Cholesterol) आणि वजन कमी (Weight Loss) होण्यास ही मदत करते.
अंडे (Eggs), चिकन (Chicken), मासे (Fish) यासारखे पदार्थ ह्यामध्ये घेऊ शकता सोबतच सोयाबीन (Soybean),
हरबरा (Gram Seeds), डाळ (Dal) व घेवडा (Ghewda) इत्यादी घेऊ शकतो.

 

 

Web Title :- Blood Sugar | blood sugar patient could not eat maggi sugar and refined flour food know what to eat in diabetes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

 

LIC Jeevan Labh Yojana | एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणुकीवर मिळेल 20 लाखाचा फंड, केवळ 252 रुपयांची करावी लागेल गुंतवणूक; जाणून घ्या

 

Maharashtra Police | महाराष्ट्र पोलिसांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’; मुंबईत गेल्या 24 तासात 71 पोलिसांना कोरोना