Blood Sugar | तुमच्या ‘या’ 3 चूकांमुळे वाढू शकते ब्लड शुगर, हे 8 उपाय करा आणि नियंत्रणात ठेवा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar | जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतात ही संख्या मोठी आहे. मधुमेहाच्या आजारात आहाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेह हा असाध्य आजार आहे, जो खराब आहार आणि जीवनशैलीमुळे होतो. वैद्यकीय भाषेत शुगर वाढण्याला हायपरग्लायसेमिया (hyperglycemia) म्हणतात. (How to control blood sugar). आपल्या कोणत्या चुकांमुळे ब्लड शुगर वाढते आणि त्यावर नियंत्रण कसे मिळवावे ते जाणून घेवूयात… (Blood Sugar)

 

1. खराब जीवनशैली :
खराब दिनचर्या असलेल्या लोकांमध्ये हाय ब्लड शुगर असण्याची शक्यता असते. उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय, व्यायाम न करणे, कोणतीही कामे न करणे, अशा जीवनशैलीमुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. (Blood Sugar)

 

2. खराब आहार :
अनेकजण आहाराबाबत उदासीन असतात. यामुळे फास्ट फूड, दारू, सिगारेट आणि अनेक वाईट सवयींचे व्यसन लागते. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे ब्लड शुगरचे प्रमाण वाढते. अशा लोकांनी रक्तातील साखरेची नियमित तपासणी करावी.

3. लठ्ठपणा आणि तणाव
लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात, काहीवेळा लठ्ठपणा हे रक्तातील साखर वाढण्याचे कारणही असते आणि जास्त तणावामुळे कोर्टिसोल हार्मोन्स रिलिज होतात, जे ब्लड शुगर वाढवण्याचे काम करतात.

 

हे उपाय करा (Remedies to control blood sugar) :
आहारात फळे आणि भाज्यांचे सेवन करावे.
ड्रायफ्रुट आणि काही औषधांचाही वापर करा.
नियमित व्यायाम, योगासने आणि मेडिटेशन करा.
शरीर आणि मन निरोगी ठेवा.
सर्वप्रथम वजन नियंत्रित करा
तणावापासून दूर राहा.
ब्लड शुगरची नियमित तपासणी करा.
कारल्याचा रस, मेथी इत्यादी घरगुती उपाय करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar | blood sugar these 5 mistakes of yours can increase know how to control diabetes home remedies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Garlic | तुम्हाला लसून खुपच आवडतो का? तर व्हा सावध! अति सेवन केल्याने लिव्हरचे होऊ शकते नुकसान

Pizza Burger | पिझ्झा-बर्गरची असेल आवड तर बिघडू शकते पचन, या 4 घरगुती उपायांनी ठिक करा पचनक्रिया

Uric Acid | वाढली असेल सांधेदुखी तर ‘या’ 5 पद्धतीने मिळवू शकता आराम, जाणून घ्या