Blood Sugar | शरीरातील ‘ही’ लक्षणे असू शकतात डायबिटीजचे सुरूवातीचे संकेत, करू नका दुर्लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar | भारतात मधुमेहाच्या रुग्णांच्या (Diabetes Patients) संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे (Blood Sugar Symptoms). मधुमेह (Diabetes) हा असा आजार आहे की त्याचे एकदा निदान झाले की तो आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो. मधुमेहामध्ये व्यक्तीचे शरीर पुरेसे इन्सुलिन (Insulin) तयार करू शकत नाही, अशा स्थितीत शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी इन्सुलिन मिळाले तर त्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास होतो (Blood Sugar).

 

मधुमेहाची सामान्य लक्षणे (Common Symptoms Of Diabetes)
इंडियन डायबिटिज फेडरेशनच्या मते, भारतात सुमारे 7 कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत. ब्लड शुगर (Blood Sugar) वाढल्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांच्या सामान्य लक्षणांमध्ये ग्लूकोमा, जखमा बर्‍या न होणे, थकवा, वारंवार डोकेदुखी, अंधुक दृष्टी, मोतीबिंदू, कमकुवत इम्युनिटी, हृदयाची धडधड, वारंवार लघवी होणे ही लक्षणे असू शकतात.

 

मधुमेहाची आढळली नवीन लक्षणे (Found New Symptoms Of Diabetes)
अलीकडेच मधुमेहाशी संबंधित काही नवीन लक्षणे दिसली आहेत. अनेक वेळा एखादी व्यक्ती शरीराद्वारे दिल्या जाणार्‍या संकेताकडे दुर्लक्ष करते, जे त्याला नंतर जड जाऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला दिसल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा –

 

पायांचे करा निरीक्षण (Observe Feet)
त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसनुसार (National Institute Of Diabetes And Digestive and Kidney Diseases) पायात काही फरक किंवा कोणतीही लक्षणे जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने आपले पाय रोज पहावे, यामुळे पायांमध्ये होणारे बदल समजू शकतील.

हे आणखी एक कारण (This Is Another Reason)
तज्ज्ञांच्या मते, जर पाय लालसर होत असतील, पाय गरम होत असतील किंवा पायाला सूज येत असेल तर हे दीर्घकाळ ब्लड शुगरचे प्रमाण (Blood Sugar Level) जास्त राहण्याचे लक्षण असू शकते. यामागील आणखी एक कारण चारकोटचा पाय असू शकतो, खरेतर चारकोट फूट/जॉइंटला न्यूरोपॅथिक जॉइंट किंवा चारकोट (न्यूरो/ऑस्टिओ आर्थ्रोपॅथी) असेही म्हणतात. हा एक प्रकारचा पायाचा विकार आहे, जो घोट्यांसोबत आपल्या शरीरातील मऊ उती, हाडे आणि सांधे प्रभावित करतो. एवढे करूनही काय प्रॉब्लेम आहे, हे समजले नाही तर डॉक्टरच सांगू शकतील.

 

किती असावी ब्लड शुगर लेव्हल (What Should Be The Blood Sugar Level)
याव्यतिरिक्त, रूग्णांनी कापणे, फोड, लाल चट्टे, सूज आणि पायाच्या नखांवर लक्ष ठेवावे,
कारण मधुमेहामध्ये शरीराला पुरेसे इन्सुलिन तयार करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते किंवा इन्सुलिन शरीरावर परिणामकारक नसते; त्यामुळे जखमा किंवा कापून संसर्ग होऊ शकतो.
NHS म्हणते की तुम्ही घरी तुमच्या पातळीवर निरीक्षण केल्यास,
सामान्य साखरेची पातळी जेवणापूर्वी 4 ते 7 mmol/l आणि जेवणानंतर 2 तासांनी 8.5 ते 9 mmol/l पेक्षा कमी असावी.

हिरव्या भाज्यांचे सेवन करा (Eat Green Vegetables)
मधुमेहाच्या रुग्णांनी हिरव्या भाज्या म्हणजे पालक, कारले, दुधी आणि कोबी यांचे सेवन करावे.
कारण त्यामध्ये व्हिटॅमिन्स, बीटा कॅरोटीन आणि मॅग्नेशियम (Vitamins, Beta Carotene And Magnesium) चांगल्या प्रमाणात असते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यामुळे ब्लड शुगर लेव्हल संतुलित राहते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar | blood sugar these symptoms can be seen in the body it can be early signs of diabetes do not ignore

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes and Turmeric | सकाळी उठताच हळदीत ‘या’ 2 गोष्टी मिसळून चाटण घ्यावे, रात्रीपर्यंत कंट्रोल राहू शकते Blood Sugar

 

Alcohol Substitute | सिगरेट-दारू सोडायची असेल तर प्या ‘ही’ 5 देशी ड्रिंक, पिताच टेन्शन आणि थकवा होईल गायब

 

Food For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांसाठी ’संजीवनी’ आहेत पिवळ्या रंगाच्या ‘या’ 5 गोष्टी, Blood Sugar ठेवतात कंट्रोल