Blood Sugar Control | ‘हे’ 3 ड्रायफ्रूट्स डायबिटीज रूग्णांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्यास उपयोगी, ब्लड शुगर ठेवतात नियंत्रणात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Blood Sugar Control | मधुमेह ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. भारतातील मोठी लोकसंख्या मधुमेहाने त्रस्त आहे. यामुळेच भारताला जगाची मधुमेहाची राजधानी असेही संबोधले जाते (Blood Sugar Control). खराब जीवनशैली आणि आहारही या आजारासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे (Natural Source of Insulin).

 

मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी वाढली की शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी होऊ लागते. मधुमेहाच्या रुग्णांना इतरही अनेक आजारांचा धोका असतो. डॉक्टरांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी इन्सुलिनच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

 

शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रुग्णांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट वाढण्याची समस्याही सुरू होते. आहारातूनही शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवता येते. इन्सुलिन वाढवण्यासाठी अनेक भाज्या, फळे, नट इत्यादी प्रभावी मानले गेले आहेत. चला तर जाणून घेऊया अशाच काही ड्रायफ्रूट्स बद्दल जे शरीरातील इंसुलिनचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत करतात. (Blood Sugar Control)

 

1. बदाम :
आरोग्य तज्ज्ञांच्या मते बदामाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. याशिवाय बदाम मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्यासही मदत करतात. मधुमेहाचे रुग्ण सकाळी रिकाम्या पोटी 4 ते 5 बदाम खाऊ शकतात, याशिवाय रात्री पाण्यात भिजवलेले बदामही चांगल्या परिणामांसाठी सेवन करू शकतात.

2. काजू :
मधुमेहाच्या रुग्णांसाठी काजूचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
रोज काजू खाल्ल्याने मधुमेही रुग्णांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण वाढते.
याशिवाय इतर ड्रायफ्रूट्सच्या तुलनेत काजूमध्ये फॅटचे प्रमाणही कमी असते,
ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि हृदयविकारांपासून बचाव होतो.

 

3. अक्रोड :
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. अक्रोड कॅलरीज बर्न करण्यास देखील मदत करते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अक्रोड खाणे मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे आणि याच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते.
याशिवाय अक्रोडाचे सेवन केल्याने टाईप-2 मधुमेह कमी होण्यास मदत होते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज 2 ते 3 भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन करावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar Control | natural insulin for diabetes blood sugar hb1ac these 3 dry fruits help in increasing insulin blood sugar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | माहिती लपवून बँकेची केली पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक; कमलेश बेताला याच्यावर गुन्हा दाखल

 

Bhabiji Ghar Par Hai | ’भाभी जी घर पर हैं’ मधील ‘मलखान’चे निधन, शूटींगला जाण्यापूर्वी क्रिकेट खेळताना घेतला अखेरचा श्वास

 

PAN Card स्मार्टफोनमध्ये असे डाऊनलोड करू शकतात यूजर्स, येथे जाणून घ्या पूर्ण पद्धत