Blood Sugar Control | नाश्त्यात समाविष्ठ करा या 5 बिया, ब्लड शुगर आणि Cholesterol होईल कंट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar Control | काही लोकांना खाण्याची आवड असते, ते दररोज वेगवेगळ्या पदार्थांची मागणी करतात. मग तो नाश्ता (Breakfast) असो वा दुपारचे जेवण. मात्र, डॉक्टर नेहमी सल्ला देतात की नाश्ता नेहमी हेल्दी, टेस्टी तसेच पोषक तत्वांनी परिपूर्ण असावा. पण काही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि जे मनात येईल ते खातात. यामुळे कोलेस्ट्रॉलपासून (Cholesterol Control) ते ब्लड शुगरपर्यंतच्या समस्या उद्भवू लागतात. येथे काही बियांबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. (Blood Sugar Control)

 

आजार टाळण्यासाठी आहारात या बियांचा करा समावेश

1) सूर्यफुलाच्या बिया (Sunflower Seeds) –
या बियांमधील फायबर एलडीएल कोलेस्टेरॉल (जे खराब कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते) कमी करण्यास मदत करते. यातील व्हिटॅमिन बी-3 (Vitamin B-3) कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि हृदयाच्या (Heart) समस्यांचा धोका कमी करते. याशिवाय टाईप-2 मधुमेहावरही (Type 2 Diabetes) हे उपयुक्त आहे.

 

2) मेथीदाणे (Fenugreek) –
मेथीदाण्यात जास्त फायबर असल्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. ते ब्ला आणि यूरिन ग्लुकोज कमी करते आणि हाय सीरम कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. कच्च्या आणि सुकवलेल्या दोन्ही मेथीदाण्यांमध्ये हे गुणधर्म असतात.

3) चिया सीड्स (Chia Seeds) –
चिया सीड्समध्ये फिनोल असते, जे सीएचईला प्रतिबंधित करते. याशिवाय ते खराब कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर (Blood Sugar) तसेच हृदयाच्या आरोग्याचा धोका कमी करते.

 

4) आळशीच्या बिया (Flax Seeds) –
आळशीच्या बिया फायबर, ओमेगा-3 फॅट्स, लिग्नान (Fiber, Omega-3 Fats, Lignan) आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत. या बियांमुळे कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि अगदी कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो, असे अनेक अहवालांतून दिसून आले आहे. (Blood Sugar Control)

 

5) भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds) –
या बियामध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि ओमेगा -6 फॅट्स (Omega-6 Fats) असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.
याशिवाय त्या रक्तदाब कमी करू शकतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar Control | you can include these seeds in breakfast it will help control blood sugar and cholesterol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil |  पुरुष आणि महिलांमधील विषमता दूर करण्यासाठी कायद्याची गरज – चंद्रकांत पाटील

Pune Chandani Chowk | चांदणी चौकातील कामाला प्रशासनाकडून गती, सेवारस्त्यासाठी 5 मिळकतींचे भूसंपादन

NCP MP Supriya Sule |  सुप्रिया सुळे यांच्याकडून प्रबोधनकार ठाकरेंचा के.सी. ठाकरे उल्लेख, मनसे नेते संतप्त