Blood Sugar Level Control | डायबिटीजच्या रूग्णांनी सकाळी ब्रश करण्यापूर्वी चघळावीत ‘ही’ पाने, ब्लड शुगर नेहमी राहील कंट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar Level Control | मधुमेह (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. याचा अर्थ असा की जर एखाद्याला साखरेचे निदान झाले असेल तर ती त्याला आयुष्यभर सोडत नाही. मधुमेह हा एक जुनाट आजार आहे. जेव्हा स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीर इंसुलिनचा योग्य वापर करू शकत नाही तेव्हा होतो (Blood Sugar Level Control).

 

इन्सुलिन (Insulin) हे स्वादुपिंडाने बनवलेले हार्मोन आहे, जे खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज रक्तप्रवाहातून शरीराच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यास अनुमती देते.

 

तज्ज्ञांच्या मते अयोग्य आहारामुळे मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. मात्र, त्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यास तो धोकादायक रूप घेऊ शकतो. सकस आहार आणि शारीरिक हालचालींद्वारेच (Healthy Diet And Physical Activity) मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांना लठ्ठपणा आणि हृदयविकार (Obesity And Heart Disease) यांसारख्या आजारांचाही धोका जास्त असतो.

 

मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात (Blood Sugar Level Control) राहू शकते.

 

ब्लड शुगर कमी करू शकणारे पदार्थ (Foods That Can Lower Blood Sugar)
जर तुम्ही देखील मधुमेहाचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला आढळणार्‍या अनेक वनस्पतींची पाने चावून खावू शकता. तुळस, ऑलिव्ह आणि गूळ (Basil, Olive And Jaggery) यांसारख्या वनस्पतींची हिरवी पाने चघळल्याने ब्लड शुगर नियंत्रित राहते, हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे.

 

1. तुळशीची पाने (Basil Leaves)
पारंपारिक औषधांचे काही अभ्यासक सामान्यतः ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी तुळशीची पाने चघळण्याची शिफारस करतात. 2019 मध्ये उंदरांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की तुळशीच्या पानांच्या अर्कामध्ये ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) कमी करण्याची क्षमता असते. परिणामांनी असेही सुचवले आहे की तुळशीची पाने हाय ब्लड शुगरच्या दीर्घकालीन परिणामांवर उपचार करण्यास मदत करू शकतात.

2. ऑलिव्हची पाने (Olive Leaves)
ऑलिव्हची पाने चघळल्याने टाईप 2 मधुमेहाचा (Type 2 Diabetes) धोका कमी होतो. 2013 च्या अभ्यासात, संशोधकांनी 46 मध्यमवयीन पुरुषांना ऑलिव्हच्या पानांचे सेवन करण्यास सांगितले. संशोधकांना असे आढळून आले की 12 आठवड्यानंतर, ज्या लोकांनी ऑलिव्हची पाने खाल्ली त्यांच्या इन्सुलिनच्या प्रतिकारामध्ये लक्षणीय सुधारणा झाली.

 

3. गुळवेलची पाने (Heart-Leaved Moonseed Leaves)
गुळवेलीला जिमनेमा सिल्वेस्ट्रे म्हणतात जी एक औषधी वनस्पती आहे.
भारतात आढळणारी ही औषधी वनस्पती ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी ओळखली जाते.

 

2013 च्या अभ्यासानुसार, टाईप 1 किंवा टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आल्या आहेत.
टाईप 1 मधुमेह असलेल्या लोकांनी 18 महिने या पानांचा अर्क घेतला त्यांच्या ब्लड शुगर लेव्हलमध्ये इन्सुलिन घेतलेल्या लोकांच्या तुलनेत लक्षणीय घट झाली.

 

4. स्टीव्हिया किंवा गोड तुळस (Stevia Or Sweet Basil)
अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) आणि अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (एडीए) नुसार,
स्टीव्हिया ही मधुमेह असलेल्या लोकांसाठी एक फायदेशीर वनस्पती आहे.
2018 च्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की ज्या रुग्णांनी स्टीव्हियाची पाने खाल्ली,
त्यांची ब्लड शुगर लेव्हल एक ते दोन तासांत कमी होऊ लागली.

5. शलगमची पाने (Turnip Leaves)
शलगमच्या हिरव्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण (Fiber Level) जास्त असते, जे 1 कपमध्ये दररोज 5 ग्रॅम प्रदान करते.
अभ्यासात असे दिसून आले आहे की टाईप 1 मधुमेह असलेले लोक जे फायबरचे सेवन करतात त्यांची ब्लड शुगर लेव्हल कमी असते.
ते टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ब्लड शुगर, लिपिड आणि इन्सुलिनची पातळी सुधारू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar Level Control | according to ayurveda and medical research these 5 types of leaves can lower blood sugar level in diabetics and increase insulin level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Intermittent Fasting Health Tips | वजन कमी करण्यासाठी ‘इंटरमिटेंट फास्टिंग’चा पर्याय निवडावा का?; जाणून घ्या

 

Bathing With Salt Water | सांधेदुखीचा त्रास होत आहे का?; मग आंघोळीच्या पाण्यात ‘ही’ गोष्ट मिसळा होईल फायदा, जाणून घ्या

 

Ayurvedic Drinks | उन्हाळ्यातील रामबाण उपाय – आयुर्वेदिक ड्रिंक ! गॅस, थकवा, तोंडात फोड आणि डायरियामध्ये तात्काळ आराम देतील ‘हे’ हेल्दी ड्रिंक, जाणून घ्या कृती