Blood Sugar | ब्लड शुगर वाढल्याने पायावर दिसतात ‘ही’ 4 लक्षणे, जाणून घ्या पायाच्या कोणत्या भागात होते वेदना

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar | डायबिटीज हा एक असा आजार आहे ज्यामध्ये ब्लड शुगरचे प्रमाण खूप जास्त होते. आपण जे अन्न खातो त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. शरीराच्या पेशींना ऊर्जेसाठी ग्लुकोजची गरज असते जी अन्नातून मिळते. इंसुलिन हे हार्मोन ग्लुकोज तुमच्या पेशींमध्ये जाण्यासाठी मदत करते. टाइप 1 डायबिटीजमध्ये स्वादुपिंड इन्सुलिन तयार करत नाही तर टाइप 2 डायबिटीजमध्ये स्वादुपिंड इन्सुलिन योग्यरित्या तयार करत नाही किंवा कमी तयार करते. (Blood Sugar)

 

पुरेशा इंसुलिनशिवाय, ग्लुकोज नेहमीप्रमाणे तुमच्या पेशींमध्ये जाऊ शकत नाही. रक्तात ग्लुकोज तयार होते आणि त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते. डायबिटीज रुग्णांनी साखरेवर नियंत्रण ठेवले नाही तर किडनी, फुफ्फुस, हृदय अशा शरीरातील अनेक अवयवांना आजार होण्याचा धोका वाढू शकतो. डायबिटीज रुग्णांमध्ये साखर वाढल्याने रुग्णाच्या डोळ्यांना आणि पायालाही इजा होऊ शकते. डायबिटीज रुग्णांची साखर वाढल्याने पायात अनेक प्रकारचे त्रास सुरू होतात. साखर वाढली की पायात तीन लक्षणे दिसतात. जाणून घेऊया पायाच्या कोणत्या भागात जास्त वेदना होतात. (Blood Sugar)

 

डायबिटीज पायाच्या समस्यांना निमित्त कसे ठरते?
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने पायातील नसा आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. पायातील नसांना झालेल्या नुकसानास डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात, ज्यामध्ये पाय सुन्न होणे, मुंग्या येणे, वेदना होणे किंवा अनुभवण्याची क्षमता कमी होणे सुरू होते. रुग्णाचे पाय दुखत नाहीत, त्यामुळे त्याला कळत नाही की पाय कापला, फोड किंवा जखम झाली आहे. पायात इन्फेक्शन होते जे लवकर बरे होत नाही. पायांमध्ये संवेदना कमी झाल्यामुळे, पाय दुखणे किंवा जखम झाल्यामुळे पाय खराब होतात.

ब्लड शुगर वाढल्याने पायात दिसतात ही 4 लक्षणे
पायाला सूज येऊ लागते.
पायाची जखम भरण्यासाठी बराच वेळ लागतो.
पाय सुन्न होणे.
आणि पायाची बोटे दुखणे आणि सुन्न होणे.

 

या गोष्टी लक्षात ठेवा
दररोज पाय तपासा. पायावर काही जखमा असतील तर लगेच डॉक्टरांना भेटा.
दररोज पाय स्वच्छ करा. पाय धुवून कोरडे करा.
कॉर्न आणि कॉलर्स सुरक्षितपणे कसे काढायचे ते तुमच्या डॉक्टरांना विचारा.
वेळोवेळी पायाची नखे कापा.
चालताना पायांचे रक्षण करण्यासाठी नेहमी योग्य शूज आणि मोजे किंवा चप्पल घाला.
पायांचे उष्णता आणि थंडीपासून संरक्षण करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar | what are the 3 most common symptoms of diabetes in the feet how to recognize it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Men Health Tips | पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट कमी करतात ‘या’ 4 चुकीच्या सवयी, होऊ शकतो पश्चाताप

Tuberculosis | जगात वाढले टीबीचे रूग्ण, 36 टक्के मृत्यू एकट्या भारतात; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाची पद्धत

Cholesterol Control | थंडीत वाढले कोलेस्ट्रॉल तर ‘या’ 5 हेल्दी फॅट फूड्सने करा कंट्रोल