Blood Sugar | डायबिटीजच्या रुग्णांची जेवल्यानंतर आणि अगोदर किती असावी ‘ब्लड शुगर लेव्हल’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar | मधुमेह (Diabetes) ही एक अशी आरोग्य समस्या आहे ज्यामध्ये जर तुमची ब्लड शुगर (Blood Sugar) वाढली तर तुम्ही अनेक आरोग्य समस्यांना बळी पडू शकता. कधीकधी गुंतागुंतीमुळे मृत्यू होऊ शकतो. मधुमेह आटोक्यात राहिला नाही तर मल्टिपल ऑर्गन फेल्युअरसारख्या (Multiple Organ Failure) समस्याही उद्भवू शकतात. (Blood sugar In Diabetes)

 

मधुमेह हा जीवनशैलीचा आजार आहे, अनेक लोक त्याला असाध्य आजार मानतात. पण आपल्या आहारात (Diet) आणि जीवनशैलीत (Lifestyle) बदल करून हा आजार टाळता येऊ शकतो. शुगर कंट्रोल (Sugar Control) करणे किती महत्त्वाचे आहे आणि अन्न खाण्यापूर्वी आणि नंतर ब्लड शुगर (Blood Sugar) किती असावी. यासोबतच तुम्हाला मधुमेहाशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे येथे जाणून घेवूयात –

 

जेवणानंतर 200 ब्लड शुगर सामान्य आहे का (Is 200 Blood Sugar After A Meal Normal)?
दुपारच्या जेवणानंतर ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) 140 mg/dL (7.8 mmol/L) पेक्षा कमी असणे ही सामान्य पातळी मानली जाते. 140 ते 199 mg/dL (7. 8 mmol/L आणि 11.0 mmol/L) ही प्रीडायबेटिस (Prediabetes) मानली जाते. खाल्ल्यानंतर दोन तासांनंतर 200 mg/dL (11. 1 mmol/L) किंवा त्याहून अधिक असल्यास मधुमेह दर्शविला जातो.

 

खाल्ल्यानंतर 3 तासांनंतर ब्लड शुगर लेव्हल किती असावी (What Should Be The Blood Sugar After 3 Hours Of Eating)?
जेवणानंतर लगेच 170-200 mg/dl पर्यंत ब्लड शुगर लेव्हल सामान्य असते. जेवणाच्या 2-3 तासांनंतर ब्लड शुगर लेव्हल 120-140 mg/dl असावी.

 

जेवण करण्यापूर्वी आणि नंतर साखरेची पातळी किती असावी (What Should Be The Sugar Level Before And After Meals)?
रिकाम्या पोटी ब्लड शुगर लेव्हल सामान्य म्हणजे 70 ते 100 दरम्यान मानली जाते. जेवणानंतर लगेच 170-200 mg/dl पर्यंत ब्लड शुगर लेव्हल सामान्य असते. जेवणाच्या 2-3 तासांनंतर ब्लड शुगर लेव्हल 120-140 mg/dl असावी.

रँडम ब्लड शुगर किती असावी (What Should Be The ‘Random Blood Sugar’)?
जेवणानंतर 2 तासांनी ब्लड शुगर लेव्हल 130-140 mg/dl दरम्यान असावी. मात्र ही लेव्हल वाढत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण (Symptoms Of Diabetes) मानले जाते. जेवणाच्या 2 तासांनंतर जर ब्लड शुगर लेव्हल 200-400 mg/dl च्या दरम्यान असेल तर ती अत्यंत धोकादायक पातळी मानली जाते.

 

शुगर कायमची बरी होऊ शकते का (Can Sugar Be Cured Forever)?
मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यावर नियंत्रण ठेवता येते. त्याला मुळापासून नष्ट करण्याचा आजपर्यंत कोणताही इलाज नाही. अशा स्थितीत एकदा मधुमेह झाला की आयुष्यभर सतर्क राहण्याची गरज असते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar | what should be the blood sugar level before and after eating the food of diabetic patients know

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास उपयोगी ठरू शकतात ‘ही’ होमिओपॅथी औषधे, घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; जाणून घ्या

 

Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा भाडेकरुंना मोठा दिलासा, भाडे न भरणे हा गुन्हा नाही

 

Pune Crime | 45 वर्षीय ‘चाचा’कडून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार