अहमदनगर : झोपेतच युवकावर खुनी हल्ला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – युवक झोपेत असतानाच एकाने हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्यातून तो तरुण बालंबाल बचावला आहे. त्याचेवर साखर कामगार रुग्णालयात उपचार चालू आहेत. राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथे आज पहाटे ही घटना घडली .

याबाबत माहिती अशी की, चांदेगाव येथील भोसले वस्ती येथील गौतम मंजाबापू भोसले हे झोपेत असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तोडं बांधलेल्या व्यक्तीने घरात प्रवेश केला. गौतम यांचा गळा विळ्याच्या सहाय्याने कापण्याचा प्रयत्न केला. जागे होताच गौतम यांनी त्यास विरोध करुन पकडण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर विळा जागेवरच टाकून पसार झाला. जखमी गौतम यास तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या गळ्याला चिरल्यामुळे २२ टाके पडले आहे.

गौतम हा जागा असल्यामुळे थोडक्यात बचावला. हल्ला करणाराने नियोजन बध्दरितीने हल्ला केल्याचे स्पष्ट होत आहे. हल्ला करण्याकरीता नवीन विळा आणलेला असून तो खास विळी नेवासा येथील आणला असावा, असे दिसते. हा हल्ला नेमका कोणत्या हेतूने करण्यात आला, हे स्पष्ट झालेले नाही.

Visit : Policenama.com