जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले ‘रिलायन्स’चे चेयरमन Mukesh Ambani, जाणून घ्या किती झाली संपत्ती

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेयरमन मुकेश अंबानी जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती वाढून 80.6 अरब डॉलर झाली आहे. अंबानीच्या संपत्तीत या वर्षी एकुण 22 अरब डॉलरची वाढ झाली आहे. संपत्तीमधील या वाढीने ते फ्रान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकून जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. आता जगात प्रमुख श्रीमंत लोकांमध्ये रिलायन्स चेयरमन यांच्या पुढे फेसबुकचे मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि अमेझॉनचे जेफ बेजोस हेच आहेत.

अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस जगातील टॉप श्रीमंताच्या यादीत मुख्य स्थानावर कायम आहेत. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार, त्याची एकुण संपत्ती 187 अरब डॉलर आहेत. बेजोस यांच्या संपत्तीमध्ये यावर्षी एकुण 72.1 अरब डॉलरची वाढ झाली आहे. बेजोस यांच्यानंतर ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्समध्ये दुसर्‍या स्थानावर आहेत मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स. त्यांची एकुण संपत्ती 121 अरब डॉलर आहे. बिल गेट्स यांच्या संपत्तीत या वर्षी 7.5 अरब डॉलरची वाढ झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्समध्ये तिसर्‍या नंबरवर आहेत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग. इंडेक्सनुसार, त्यांची एकुण संपत्ती 102 अरब डॉलर आहे. झुकरबर्ग यांच्या संपत्तीमध्ये यावर्षी एकुण 23 अरब डॉलरची वाढ झाली आहे. आता मार्क झुकरबर्ग प्रथमच 100 अरब डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी झाले आहेत. जगात तीनच व्यक्ती आहेत, ज्या या क्लबमध्ये सहभागी आहेत. या तीन जगातील प्रमुख श्रीमंत व्यक्ती आहेत.

बर्नार्ड अर्नाल्ट ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्समध्ये घसरून पाचव्या स्थानावर आले आहेत. त्यांची एकुण संपत्ती 80.2 अरब डॉलर आहे. या वर्षी आतापर्यंत अर्नाल्ट यांच्या संपत्तीचे 25 अरब डॉलरचे नुकसान झाले आहे.