मुलांचं जेवण थंड करण्यासाठी त्यावर फुंकर घालताय सावधान ! एकदा हे वाचाच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लहान बाळाचे पालनपोषण करणे सोपे नाही. यामध्ये आई-वडिल दोघांचा तितकाच सहभाग असतो. दोघेही बाळाची तशीच काळजी घेत असतात. लहान-लहान गोष्टीमध्ये आई बाळाची काळजी घेत असते. पण यामध्ये आईचा वाटा जास्त असतो. कारण ती सतत बाळाजवळ असते. त्याला काय हवे आहे ते पाहत असते. अगदी बाळाच्या आंघोळीपासून ते झोपवण्यापर्यंत काळजी घेत असते.

आपण पाहिले असेल की, बाळाला आई घास भरविताना घास थंड होण्यासाठी त्यावर फुंकर घालत असते. ती हे का करत असते ? कारण बाळाला तोंडाला भाजू नये म्हणून कारण ते खुप नाजुक असतात. त्यामुळे ती प्रत्येक गोष्टीत काळजी घेत असते. या काळजीपोटी केलेल्या गोष्टी बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पण या गोष्टी सहज घडून जातात. याच सवयीचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात.

आपण घास भरविताना त्यावर फुंकर जेव्हा मारतो तेव्हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्ग होऊ शकतो. जर तुमच्या दातावर कॅविटी आहे आणि तुम्ही मुलांना भरवताना त्यावर फुंकर घातली, तर तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया मुलांच्या खाण्यात जातात. आणि त्यामुळे मुलांच्या तोंडामध्ये प्लाक तयार होते. आणि लहान मुलांना दात येण्याआधीच त्यांच्या तोडांमध्ये कॅविटी तयार होतात. मग मुलांचे दात किडण्यास सुरुवात होते.

त्यामुळे याची काळजी अशी घ्यावी. मुलांचे जेवण थंड होण्यासाठी त्यावर फुंकर मारु नका, तुम्ही जेवण करताना ज्या भांड्यांचा वापर करता तेच मुलांना वापरु नका, मुलांच्या दातांच्या स्वच्छतेची काळजी घ्या, मुलांचे तोंड स्वच्छ पाण्याने पुसून घेत चला, मुलांचे जीभ, दात, गाल स्वच्छ करा.