गेल्या १५ वर्षात ‘नासा’ला ‘मंगळ’ ग्रहावर सापडलं ‘जामून’, ‘ससा’ आणि ‘माणूस’ ; जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम : नासाने मंगळ ग्रहावर २००३ मध्ये दोन रोव्हर पाठवले होते. त्या रोव्हरनी मंगळ ग्रहावरील अनेक फोटो नासाला पाठवले. या रोव्हर्सची नावे आहेत, ऑपर्च्युनिटी आणि स्पिरिट. या दोम्ही रोव्हरनी मंगळावरील मिशन दरम्यान काही विचित्र गोष्टी शोधल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊ या काय आहेत त्या विचित्र गोष्टी आणि जाणून घेऊ या त्यांचा अर्थ.

२००३ या वर्षात नासाने त्यांचे दोन मानवरहित रोव्हर मंगळ मिशनसाठी पाठवले होते. ये रोव्हर तेव्हापासून मंगळावरील फोटो नासाला पाठवत आहेत. या वर्षाच्या सुरवातीला नासाने १५ वर्षाचे मिशन पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.ऑपर्च्युनिटी या रोव्हरसोबत असलेला नासाचा संपर्क गेल्या ८ महिन्यापासून तुटला आहे.

ऑपर्च्युनिटी हा नासाचा सर्वात जास्त काळ मंगळावर असणारा रोव्हर आहे. नासाच्या स्पिरिट रोव्हरच्या तुलनेत ऑपर्च्युनिटी खूप जास्त काळ कार्यरत राहिला आहे. स्पिरिटने २०१० सालीच काम करण्यास बंद केले होते.

आता दोन्ही रोव्हरनी काम करणे बंद केल्यामुळे मिशन पूर्ण झाल्याचे नासाने म्हंटले आहे. १५ वर्षाच्या या काळात रोव्हरनी मंगळावरील कोणकोणत्या नवीन गोष्टी शोधल्या आहेत, त्याचाच हा एक आढावा.

रोव्हरने ब्लूबेरीज सारखे दगड शोधले

जामून का ब्लूबेरीज
ऑपर्च्युनिटी रोव्हरला मंगळावर उतरवल्यानंतर काही दिवसातच काही वेगळ्या दिसणाऱ्या दगडांचे फोटो पाठवले. हे फोटो पाहिल्यानंतर वैज्ञानिकांना हे फोटो कशाचे आहेत हेच लक्षात आले नाही. नंतर त्यांनी या दगडासारख्या दिसणाऱ्या वस्तूचे नाव ब्लूबेरीज ठेवले.
Tue

पृथ्वीशिवाय इतर ग्रहावर देखील उल्कापिंड
२००५ मध्ये ऑपर्च्युनिटी रोव्हरने एक उल्का देखील पहिली होती. त्या उल्केचा आकार एका बास्केट बॉलसारखा होता. त्यावेळी नासाने पृथ्वीशिवाय दुसऱ्या ग्रहावर सापडलेला पहिली उल्का असल्याचे सांगितले.

रोव्हरने फक्त याला शोधूनच काढले नाही तर याचे परीक्षण देखील केले आहे. त्यातून दिसून आले कि यामध्ये लोह आणि निकेल हे धातू आहेत. नासाने यानंतर याचे नाव हिट शिल्ड रॉक असे ठेवले होते.

मोठमोठ्या कानांसारखा ससा

बनी ससा
ऑपर्च्युनिटी मंगळावर सजीवसृष्टीचे अस्तित्व असल्याचे पुरावे देऊ शकले नाही. रोव्हरने एक फोटो पाठवला होता. त्या फोटोत वेगळीच गोष्ट दिसून येत होती. तिचा आकार मोठमोठे कान असलेल्या सशासारखा होता. मंगळावर हवा सुटल्यानंतर हे कान हलताना देखील दिसले. नासाच्या इंजिनिअर यांनी हि गोष्ट जिवंत प्राणी असल्याचे पूर्णपणे नाकारले होते.
Rabbit

जेली डोनट
यानंतर या रोव्हरने अजून एक अजिब गोष्ट शोधून काढली होती. हि डोनेटसारखी दिसणारी रहस्यमय गोष्ट होती. २०१४ मध्ये ऑपर्च्युनिटी ने हि गोष्ट शोधून काढली होती.
Jelly Donut

मंगळावर माणूस
२००७ या वर्षात स्पिरिट रोव्हरने एक फोटो पाठवली होती. ज्यामध्ये एका दगडावर माणसासारखे काही तरी दिसत होते. माणसासारखी दिसणारी गोष्ट दिल्यामुळे मंगळावर देखील जीवसृष्टीचे अस्तित्व आहे अशी चर्चा सुरू झाली होती. पण नासाने असे काहीही नसल्याचे सांगितले. हा एक भ्रामक दगड आहे.
Man on Mars

लिंगनूमा रोव्हर चे निशाण
मंगळ ग्रहावर २००४ मध्ये पोहचल्यानंतर स्पिरिट रोव्हरने मंगळावर जे निशाण बनवले ते काहीशा लिंगासारखे होते. हे पृथ्वीवर पाठवल्यानंतर १० वर्षांनतर कोणत्या तरी रेडिएट युजरने हा फोटो शेअर करून हि गोष्ट लिहिली आहे. लोकांनी यावर मुं देखील बनवले.
Linguuma