ब्लड प्रेशर आणि स्मरणशक्तीसाठी विशेष फायदा देते BlueBerry ! जाणून घ्या ‘हे’ 9 आरोग्यवर्धक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ब्लूबेरी असं फळ आहे ज्याला ज्याला सुपर फ्रूट म्हटलं जातं. ब्लड प्रेशर आणि विसराळू लोकांच्या स्मरणशक्तीसाठी याचा खूप फायदा होतो. विसरभोळ्या लोकांना ब्लूबेरी खायला देऊन यासंदर्भात करण्यात आलेल्या रिसर्चमधून ही गोष्ट सिद्ध झाली आहे. तसं तर वयोवृद्धांना याचा खूप जास्त फायदो होतो. परंतु सर्वच वयोगटातील लोक ब्लूबेरी खाऊ शकतात. आज आपण ब्लूबेरी खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. रोज एक कप ब्लूबेरी खाल तर अनेक आरोग्यवर्धक फायदे होतील.

– ब्लूबेरी खाल्ल्यानं रक्तवाहिन्यांमधील दाब कमी होतो.
– ब्लड प्रेशरची समस्या दूर होते.
– रक्ताभिसरण चांगलं होतं.
– यातील पॉनीफेनॉल्समुळं स्मरणशक्ती वाढते.
– मेटाबॉलिजम बूस्ट होतं
– फॅटी लिव्हरची समस्या दूर होते
– डायजेस्टीव्ह सिस्टीममधून टॉक्सिन्स बाहेर पडतात.
– ब्लूबेरीचा इतरही अनेक समस्यांवर फायदा होतो.
– वयोवृद्धांना जास्त लाभ होतो.

ब्लूबेरी तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये खाऊ शकता. एका रिसर्चमध्ये काही विसरभोळ्या लोकांना ब्लूबेरी खाण्यासाठी देण्यात आल्या. त्यांनी याचं सेवन केल्यानंतर त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये काही चांगल्या सुधारणा दिसल्या.