BMCवर मोठी नामुष्की : सचिन तेंडुलकरला नागरी सन्मान पुरस्काराचा प्रस्ताव रद्द ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेला पुरस्काराचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला आहे. याला कारण आहे सचिन तेंडुलकर याला तब्बल 10 वर्षांपासून पुरस्कार घ्यायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे अखेर महापालिकेकडून नागरी सन्मान पुरस्कार रद्द करण्यात आला.

2005 साली महापालिकेने गटनेत्यांच्या बैठकीत कसोटी शतकाचा विक्रम करणाऱ्या सचिन तेंडूलकरला मुंबईकर म्हणून नागरी सत्कार करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र सचिन तेंडुलकर कडून पालिकेला पुरस्काराबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने वाट पाहून अखेर प्रस्ताव गुंडाळण्यात आला आहे. हा प्रस्ताव 10 वर्षांपासून पडून होता. पाठवलेल्या पत्राला देखील सचिनने काहीही प्रतिसाद न दिल्याने हा प्रस्ताव पालिकेने रद्द केला.

मुंबई महापालिकेकडून सचिनला नागरी सत्कार देऊन सन्मानित करण्यासाठी 11 डिंसेबर 2011 ही तारीख देखील निश्चित करण्यात आली होती. मात्र तेव्हा देखील सचिन कडून कोणाताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर विनावन्या करुनही पुरस्कार न स्वीकारल्याने महापालिकेने पुरस्काराचा प्रस्तावच रद्द केला.

देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार स्वीकारणाऱ्या सचिनने मात्र मुंबई महापालिकेचा नागरी सन्मान पुरस्कार न स्वीकारण्याचे कारण स्पष्ट झाले नाही. परंतू मुंबईकर असून मुंबई महापालिकेने त्याचा सन्मान करण्यासाठी नागरी सन्मान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सचिनने न स्वीकारल्याने तो रद्द करण्यात आला.
आरोग्य विषयक वृत्त-
नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही
रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या
हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा
निरोगी हृदयासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like