BMC Commissioner Iqbal Singh Chahal | ठाकरेंचे विश्वासू अधिकारी ईडीच्या रडारवर, BMC आयुक्त चहल यांना 100 कोटींच्या घोटाळाप्रकरणी ईडीची नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विश्वासू अधिकारी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) हे ईडीच्या (ED) रडारवर आले आहेत. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीने समन्स पाठवला आहे. कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये (Corona Center) वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केला होता. याप्रकरणी आयुक्त चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांना सोमवारी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. हा संपूर्ण घोटाळा 100 कोटींचा असून यामध्ये बेनामी कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

कोरोना काळात बीएमसीकडून कोव्हिड सेंटरमध्ये (Covid Center) वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवठा करण्यासाठी बाहेरील कंपनीला कंत्राट दिले. तसेच लाइफ लाइन हॉस्पिटल (Life Line Hospital) मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिले होते. मात्र ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. यामध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुंबईत कोरोनाचा विस्फोट सुरु होता त्यावेळी मुंबई महापालिकेने मोठी आणि महत्त्वाची कामे केली होती.
कोरोना संकट काळात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला.
पण कोट्यावधी नागरिकांना वाचवण्यात मुंबई महापालिकेला यश आले.
विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने महापालिकेपुढे मोठे आव्हान होतं.
पण ते आव्हान महापालिकेने पेललं होतं.

Web Title :- BMC Commissioner Iqbal Singh Chahal Thackeray’s trusted official on ED’s radar, ED notice to BMC commissioner Chahal in Rs 100 crore scam case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bombay High Court | मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा, पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

Chandrashekhar Bawankule | ‘…त्यामुळेच ते दुसऱ्यांवर टीका करतात’; चंद्रशेखर बावनकुळेंची काँग्रेसवर टीका