BMC Election | मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना भाजपासह काँग्रेस-राष्ट्रवादीला देखील देणार ‘टक्कर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BMC Election | शिवसेनेचा मुंबईत विस्तार व्हावा ही पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) स्वबळावर लढणार असून 100 पेक्षा अधिक जागा जिंकण्याची तयारी सुरु आहे. पालिकेच्या गतवेळच्या निवडणुकीतही शिवसेना स्वतंत्र लढल्याचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत (ZP By-Elections) शिवसेना चौथ्या क्रमांकावर राहिली आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात (BMC Election) प्रश्न विचारण्यात आला होता. राऊत म्हणाले की, शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला. त्यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे राज्य नसेल तर कुणाचे राज्य असेल, असा दावा करतानाच पालिकेत शिवसेनेचाच महापौर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दसरा मेळाव्या संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, दसरा मेळावा हा सांस्कृतिक उत्सव असून फटाके वगैरे फोडून तो जल्लोषात साजरा होईल.
मुख्यमंत्र्यांनीही दसरा मेळावा घेण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. नियम पळून सण साजरे होत आहे दसरा मेळावाही होईल.
मेळावा कुठे होणार हे आताच सांगू शकत नाही. असेही राऊत म्हणाले.

शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
गत वर्षी दादर येथील राष्ट्रीय सावरकर स्मारकाच्या सभागृहात हा मेळावा झाला होता.
यंदा हा मेळावा कुठे घ्यायचा हे निश्चित झाले नसले तरी षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा आयोजित केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title :- BMC Election | shivsena will contest bmc elections on its own fight with bjp as well as congress and ncp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | अबब ! नानासाहेब गायकवाडच्या लॉकरमधील ‘खजिन्या’चा पर्दाफाश; हिरे, सोनं-चांदी अन् रोकड…

Sharad Pawar | आगामी निवडणूकांच्या संदर्भात शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…

Chandrakant Patil | राष्ट्रवादीच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण, म्हणाले – ‘शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे हे छापे…’