BMC Elections | BMC च्या प्रभागाच्या संख्येवरून आता पालिका आणि राज्य निवडणूक आयोग नोंदवणार जबाब; उच्च न्यायालयाचे याचिका सुनावणीवेळी आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात जवळ जवळ गेल्या एक महिन्यापासून महानगरपालिकांच्या निवडणूक अडकून पडल्या आहेत. त्यावर कोणतीही प्रगती होताना दिसत नसताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी (BMC Elections) अजून लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Elections) प्रभागांची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्यासाठी एकनाथ शिंदे-भाजप सरकारने (Shinde-Fadnavis Government) घेतलेला निर्णय आणि त्याअनुषंगाने काढलेला अध्यादेश व त्यानंतर केलेली कायदादुरुस्ती याला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान देण्यात आले आहे.

 

तर, याप्रकरणी आपली भूमिका २५ नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट करण्याच आदेश हायकोर्टाने राज्य निवडणूक आयोग आणि मुंबई महापालिकेला दिले आहेत. तत्कालीन, महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) मुंबईतील प्रभाग (Wards) संख्या वाढवून 236 केली होती. पण शिंदे-भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी प्रभाग संख्या पुन्हा 227 केली. सरकारच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटातील (Uddhav Thackeray Group) माजी नगरसेवक राजू पेडणेकरांनी (Raju Pednekar) याचिकेद्वारे आव्हान दिले. आता मुंबई उच्च न्यायालायने मुंबई महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) यासंबंधी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे.

‘शिंदे सरकारने काढलेला अध्यादेश व केलेली कायदादुरुस्ती घटनाबाह्य असून रद्दबातल करावी.
या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत अध्यादेश व कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी आणि पूर्वीच्या पूर्ण झालेल्या प्रभाग पुर्रचनेच्या प्रक्रियेप्रमाणे व सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशाप्रमाणे निवडणूक घेण्याचा आदेश आयोगाला द्यावा’, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
याआधी पेडणेकरांनी नवा अध्यादेश व कायदादुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते.
‘हा विषय आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि सर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी यथास्थिती ठेवण्याचा
आदेश दिलेले असताना राज्य सरकारने कायदा दुरुस्ती करत आधीच्या सरकारचा निर्णय बदलला’,
असे पेडणेकर यांनी वकिलांमार्फत निदर्शनास आणले होते.
मात्र, ‘याप्रश्नी मुंबई उच्च न्यायालय योग्य तो निर्णय देऊ शकते’, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात जाण्याची सूचना केली.
त्याप्रमाणे पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात ही याचिका केली होती.

 

Web Title :- BMC Elections | bombay high court will hear plea of raju pednekar over bmc election ward numbers next hearing on 29 november

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shraddha Walkar Murder | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजर; फाशीसाठी आवारात वकिलांचा राडा

Rahul Gandhi | ‘ते घाबरत नसते, तर त्यांनी कधीच या पत्रावर सही केली नसती’; राहुल गांधींची सावरकरांवर पुन्हा टीका

Chandrapur Murder Case | तीन महिन्याने बाहेर आला खुनाचा कट, मुलीने कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यामुळे आई अटकेत