BMC Elections | BMC निवडणुकीपूर्वी ‘या’ माजी महापौरांचा राष्ट्रवादीत प्रवेश; मुंबईत NCP बळकट होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – BMC Elections | मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation Elections) देशातील सर्वात मोठी महानगपालिका म्हणून ओळखली जाते. लवकरच मुंबई महानगरपालिकेची (BMC Elections) निवडणुक जाहीर होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीमध्ये (NCP) माजी महापौरांनी प्रवेश केल्यामुळे पक्षाला अधिक बळकटी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर (Nirmala Samant-Prabhavalkar) यांनी आज प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

 

 

निर्मला सामंत यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला येणाऱ्या मुंबई मनपा निवडणुकीत (BMC Elections) अधिक बळकटी मिळेल असा विश्वास पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी यावेळी व्यक्त केला. पक्षाच्या अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्षा खासदार वंदना चव्हाण (Vandana Chavan) यांच्या मान्यतेने निर्मला सामंत यांची मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निर्मला सामंत यांच्या पक्षप्रवेशावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje), माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan), युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mehbub shekh), प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chauhan), अर्बन सेल प्रदेश सेक्रेटरी सुरेश पाटील (Suresh Patil), माजी नगरसेविका अल्पना पेंटर (Alpana Painter) आदी उपस्थित होते.

 

आगामी पालिका निवडणुकांबाबत मोठा निर्णय

आगामी 18 पालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation elections )
प्रभागाऐवजी एक सदस्यीय वार्ड पद्धत जाहीर करण्यात आली होती
पण आता मुंबई (mumbai) वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी (Corporation elections)
तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

 

Web Title :- BMC Elections | strengthen the party before the mumbai municipal corporation elections-former mayor Nirmala Samant Prabhavalkar joins ncp jayant patil BMC Elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा