मुंबई महापालिकेने तयार केली गणेशोत्सवासाठीची नियमावली 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

गणेश बाप्पाचे आगमन थोड्या दिवसांवर येऊन ठेपले असून उत्सवासाठी गणेश मंडळांनी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी एक नियमावली तयार केली आहे. मुंबई महानगर पालिकेंतर्गत एकूण दहा हजार सातशे नोंदणीकृत गणेशमंडळे आहेत.

काय आहे नियमावली –

  • मंडपाच्या बाजूला 10 फूट अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पादचारी यांच्यासाठी जागा सोडावी लागणार.
  • मंडपात फायर रेझिस्टंट सिस्टम असणे गरजेचे
  • खड्डे जर खणले तर गणेशविसर्जनानंतर 10 दिवसांत बुजवून त्याचे फोटो महापालिकेला पाठवावे.
  • गणपती मंडपासाठी बीएमसी, पोलिस, वाहतूक विभाग, अग्निशमन दल यांचा परवाना घेणे आवश्यक
  • मंडपापासून 100 मीटर दूर भक्तांच्या गाड्यांसाठी पार्किंग
  • मंडपाच्या बाहेर मंडपाच्या नकाशाचा आराखडा असावा
    दरम्यान, गणेशोत्सवासाच्या पार्श्वभूमीवर काल (बुधवारी ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गणेश मंडळाशी वार्तालाप करताना मंडळांनी  बिनधास्त उत्सव साजरा करावा असे सांगितले आहे.