BMC Mayor Kishori Pednekar | BMC च्या महापौर किशोरी पेडणेकरांना पत्र लिहिणारा निघाला वकील; अश्लिल भाषेत दिली होती धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BMC Mayor Kishori Pednekar | मुंबईच्या विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. संबधित धमकीचं पत्र (Threatening letter) किशोरी पेडणेकर यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर आलं होतं. आता या पत्राचा खुलासा झाला आहे. महापौरांना धमकी दिलेलं पत्र उरणमधील विजेंद्र म्हात्रे (Vijendra Mhatre) नावाच्या वकिलांनी पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. दरम्यान, महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुसऱ्यांदा धमकी आली आहे.

 

आज (शुक्रवारी) महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी (Threatening letter) देण्यात आली. यानंतर याप्रकरणी पेडणेकर यांनी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) तक्रार दाखल केली आहे. यानंतर किशोरी पेडणेकर यांनी धमकीच्या पत्राबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, ‘धमकी पत्र सकाळी मला मिळालं. गेली 40 वर्ष राजकारणात असून चारित्र्य जपलं. आज सकाळी एक पत्र मिळालं. या पत्राची भाषा अत्यंत लज्जास्पद आहे. मारून टाकु विटंबना करू, मुलगा आणि नवऱ्याला मारून टाकु तुमच्या अवयवांची विटंबना करू अशी भाषा वापरली, हे अत्यंत किळसवाने होते,’ असं सांगताना महापौर पेडणेकर भावनिक झाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, ‘महिलांचा मान आपण राखतो पण आता राजकीय टीका स्तर खालावत चालला आहे.
वापरलेले शब्द मला क्लेशकारक आहे विजेंद्र म्हात्रे (Vijendra Mhatre) या नावाच्या व्यक्तीने हे पत्र लिहिलं आहे.
हे पत्र उरणमधून पाठवलंय. पोस्टल पनवेलच आहे, विजेंद्र म्हात्रे याने हे पत्र लिहिलं असून तो वकील (Lawyer) आहे असे लिहिले आहे.
तर, ‘मला माझा पक्षाच काम महत्त्वाचे आहे परंतु माझे कुटुंब देखील महत्त्वाचे आहे. या पत्राला मी भीक घालत नाही.
याचं काही न काहीतरी कनेक्शन आहे ते पोलीस शोधून काढतील, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

 

Web Title :- BMC Mayor Kishori Pednekar | lawyer wrote a letter to BMC mayor kishori pednekar in obscene language mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai NCB | NCB ने अटक केलेल्या आरोपीचा कारागृहात मृत्यू; प्रचंड खळबळ

PPF Account मुलांपासून मोठ्यांच्या नावाने उघडता येते, NSC पेक्षा मिळते जास्त व्याज; RD पेक्षा सुद्धा याबाबतीत चांगले

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 58 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी