BMC | ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिन्हं नाहीत’; मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BMC | कोरोनाच्या दुस-या लाटेनं (Corona virus) मंदगती केली. त्यानंतर तिस-या लाटेच्या धोक्याचा इशारा तज्ञांनी वर्तवला होता. यावरुन राज्यासह देशात चर्चा आहे. मात्र, मुंबई महापालिकेनं (BMC) उच्च न्यायालयात (High Court) एक महत्वपुर्ण माहिती दिली आहे. मुंबईमध्ये लसीकरण (Vaccination) मोहिम व्यवस्थितपणे सुरु असल्यानं तिसरी लाट येण्याची चिन्हं दिसत नाहीत, अशी माहिती दिली आहे.
शहरात 42 लाखांहून जादा लोकांनी कोरोना लसीचे 2 डोस घेतले आहेत तर 82 लाखांहून जादा लोकांनी 1 डोस घेतला आहे. तर,अंथरुणाला खिळलेल्या 2586 लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर अशाच 3942 लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
अद्यापही लसीकरण (Vaccination) मोहिम व्यवस्थित सुरु आहे. सध्या लसीचा कुठलाही तुटवडा भासत नाही.
मुंबई कोरोनापासून सुरक्षित आहे. आम्हाला कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिन्हं दिसत नाही.
असं महापालिकेचे (BMC) वकिल अनिल साखरे (Advocate Anil Sakhre) यांनी न्यायालयात (High Court) सांगितले आहे.
दरम्यान, यापुर्वी अॅड. धृती कपाडिया (Adv. Dhriti Kapadia) आणि कुणाल तिवारी (Kunal Tiwari) यांनी जनहित याचिका दाखल करत राज्य आणि केंद्र सरकारने 75 वर्षांवरील नागरिक,
ज्येष्ठ नागरिक तसेच अंथरुणाला खिळलेल्या अपंग व्यक्तींसाठी घरोघरी जाऊन लस द्यावी, अशी मागणी केली होती.
यावेळी उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी वकील अनिल साखरे (Advocate Anil Sakhre) यांनी न्यायालयात याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, मागच्या महिन्यात घरोघरी लस देण्यास केंद्राकडून (Central Government) परवानगी मिळाली.
मात्र त्याआधी राज्य सरकारकडून (State Government) पायलट प्रोजेक्ट म्हणून अंथरुणाला खिळलेल्या लोकांना लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली होती.
Web Title : BMC | no signs of third wave of corona virus bmc says in mumbai high court today
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Javed Akhtar | वादग्रस्त विधानावरुन जावेद अख्तर यांच्या विरोधात FIR
Pune Cyber Crime | पुण्यातील फॅशन डिझायनर तरूणीला 7 लाखांचा गंडा, जाणून घ्या प्रकरण
Pune Anti Corruption | 20 हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अँटी करप्शनकडून अटक