महत्वाच्या बातम्या

‘ऑफिस पुन्हा बनेल परंतु शिवसेनेची ‘औकात’ सर्वांना माहित झाली’, बबिता फोगाटची जहरी टीका

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मुंबई महापालिकेनं बॉलिवूड स्टार कंगना रणौतच्या पाली हिलमधील कार्यालयावर कारवाई सुरू केली आहे. यानंतर कंगनानं ट्विट करत शिवसेनेवर हल्ला चढवला होता. आता कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद शिगेला गेला आहे. अशात कंगनाच्या सपोर्टमध्ये दबंग गर्ल बबिता फोगाट पुढं आली आहे. तिनं शिवसेनेची औकात काढली आहे.

शिवसेनेवर टीका करताना बबिता फोगाट म्हणाली की, “मृत्यू जवळ आला की, गिधाड शहराकडे धाव घेतो. शिवसेनेची तशीच अवस्था आहे. कंगना रणौत यांना घाबरणारी नाही. संपूर्ण देश तिच्या पाठीशी आहे. ऑफिस पुन्हा बनवलं जाईल परंतु शिवसेनेची औकात सर्वांना माहित झाली. तू (कंगना) घाबरू नकोस. संपूर्ण देश तुझ्यासोबत उभा आहे.”

कंगना रणौत हिनं देखील कारवाईचे फोटो ट्विट करत शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्ला चढवला होता. एकाच तासात कंगनानं 5 ट्विट करत ठाकरे सरकारसह मुंबई महापालिकेला लक्ष्य केलं होतं.

एका ट्विटमध्ये तर कंगनानं तिच्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना ही थेट बाबराशी केली आहे. कंगना म्हणते, “मणिकर्णिका फिल्म्स मध्ये पहिल्या सिनेमा घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं. त्यामुळं ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज तिथं बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडलं जात आहे. परंतु बाबर तू हे लक्षात ठेव, तिथंच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम.”

https://twitter.com/KanganaTeam/status/1303563425193189376?s=20

 

Back to top button