मुंबई ‘महापौर’ पदी किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिवसेनेकडून शिक्कामोर्तब ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आता विधानसभेनंतर निवडणूका आहेत महानगर पालिकेच्या महापौरपदासाठी. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेकडे 94 संख्याबळ आहे. यात शिवसेनेतील इच्छुकांची यादी तशी मोठी होती परंतू किशोरी पेडणेकर महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहे. विधानसभेत वरळीत प्रचारासाठी किशोरी पेडणेकर यांनी मेहनत घेतली होती. याबरोबरच अशिष चेंबूरकर, समाधान सरवणकर, अमेय घोले, मिलिंद वैध, मंगेश सातमकर, शुभदा गुढेकर यांचे नाव चर्चेत होते परंतू वृत्तानुसार महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे.

21 नोव्हेंबरला महापौरपदांची मुदत संपणार –
येत्यात 21 नोव्हेंबरला राज्यातील 27 महानगरपालिकेच्या महपौरांच्या पदाची मुदत संपत आहे. बुधवारी मंत्रालयात यासंबंधित आरक्षण सोडत काढण्यात आली होती. या मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी आरक्षित झाल्याने या पदासाठी चुरस वाढली. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे आणि त्याचे सर्वात जास्त 94 सदस्य आहेत.

विधानसभा निवणूकीत मिळाली होती 3 महिन्यांची मुदवाढ –
15 सप्टेंबरलाच राज्यातील 27 महानगरपालिकेच्या महापौरांची पहिली अडीच वर्षांची मुदत संपली होती. परंतू विधानसभा निवडणूकामुळे या पदांसाठीची मुदतवाढ तीन महिने वाढवण्यात आली. ही मुदत 21 नोव्हेंबरला संपणार असून 22 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक 22 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्यावर नव्या महापौर पदाची जबाबदारी येऊ शकते.

Visit : Policenama.com