‘कोरोना’ला रोखण्यासाठी ‘निरोगी’ मुंबईकरांसाठी पालिका देणार ’हे’ औषध

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा हैदोस वाढत चालला असून प्रादर्भाव कमी करण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही आहे. मात्रा, तरीही डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सध्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर देत आहेत. मुंबई हे कोरोनाचे सर्वात मोठे हॉटस्पॉट झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महापालिकेने एक खास औषध देण्याचा निर्णय घेतला आहे. निरोगी लोकांना आर्सेनिक अल्बम या होमिओपथिक गोळ्या देण्यात येणार आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने निरोगी लोकांना औषध दिले जाणार आहे. विशेषतः धारावी आणि वरळी कोळीवाड्यातील नागरिकांना औषध वाटण्यावर भर दिला जाणार आहे.

धारावी आणि वरळी हे दोन्ही हॉटस्पॉट क्षेत्र आहेत. त्यामुळेयेथील निरोगी नागरिकांच्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे औषध देण्यात येणार आहे. याआधी नागरिकांना हायड्रोक्लोरोक्विन हे औषध देण्यात येणार होते, मात्र त्याचे शरीरावर होणारे विपरित परिणाम लक्षात घेता, हा निर्णय रद्द करण्याता आला. महापालिकेकडे आरजू स्वाभीमान नागरी समितीने अर्सेनिक अल्बत 30 या गोळ्या नागरिकांना तसेच हॉटस्पॉट परिसरातील वृद्धांना देण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार आता या औषधाचे वितरण धारावी आणि वरळी या क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. आजपासून धारावी, माहिम दादर परिसरात या औषधांचे वितरण करण्यात येणार आहे.

महापालिकेने या औषधाचे वितरण करण्याची परवानगी दिली असली तरी, हे औषध घ्यायचे की नाही हा निर्णय नागरिकांचा असणार आहे. काही दिवस पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाहणी करण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईत सोमवारी तब्बल 791 रुग्णांची वाढ झाली. तर 587 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. सोमवारी 36 पैकी 20 मृत्यू मुंबईतले आहेत. मुंबईतल्या रुग्णांची संख्या 14 हजार 355वर गेली आहे.