BMC WhatsApp Chatbot | जय महाराष्ट्र ! बृहन्मुंबई मनपा (BMC) ठरली व्हॉट्सअपवर 80 सेवा देणारी देशातील पहिली महापालिका
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BMC WhatsApp Chatbot | बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) देशातील पहिली महापालिका (Municipal Corporation) बनली आहे, जी आपल्या नागरिकांना सुमारे 80 सेवा व्हॉट्सअॅपवर (80 services on WhatsApp) उपलब्ध करून देत आहे. (BMC WhatsApp Chatbot)
यामुळे आता मुंबईतील लोकांना BMC कार्यालयाच्या फेर्या माराव्या लागणार नाहीत. बीएमसीच्या 80 नागरी सुविधा लोकांना घरबसल्या व्हॉट्सअॅपपवर मिळतील ही माहिती बीएमसी आयुक्त आय. एस. चहल यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी बीएमसीची ‘व्हॉट्सअप चॅट-बोट’ सुविधा (BMC ‘WhatsApp chat-boat’ facility) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाँच केली. मुख्यमंत्र्यांनी व्हॉट्सअॅप नंबर 8999228999 जारी करत म्हटले की, लोक बीएमसीच्या सुविधांचा लाभ यावर चोवीस तास घेऊ शकतील. (BMC WhatsApp Chatbot)
ठाकरे यांनी म्हटले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. या सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी करावी लागणार नाही.
Web Title : BMC WhatsApp Chatbot | bmc launches whatsapp chatbot for 80 services for citizens
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च
Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश