Good News ! डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत यशस्वी बोलणी, मुंबईकरांना मिळणार स्पुटनिक लस, महापौरांची माहिती
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत ज्या वेगाने लसीकरण होणे गरजेचे होते, त्या वेगाने होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई महापालिकेने (BMC) लशींसाठी ग्लोबल टेंडर (Global Tender) काढण्याचा निर्णय घेतला. परंतु याच दरम्यान डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr. Reddy Laborotories) यांच्यासोबत बोलणी सुरु होती. आता ही बोलणी यशस्वी झाल्याने मुंबईकरांना स्पुटनीक लसींचे डोस (Sputnik Vaccine) मिळणार आहेत. अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी दिली आहे.
Pune Lockdown : पुण्यात अनलॉक? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत, सोमवारी होऊ शकतो निर्णय !
ग्लोबल टेंडरमधील पुरवठादार अपात्र
कोरोना लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) काढलेले ग्लोबल टेंडर अखेर रद्द करण्यात आले आहे.
निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र ठरली नाही.
त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 9 संभाव्य पुरवठादार कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अपात्र ठरले आहेत.
प्रायोगिक तत्त्वावर स्पुटनिक लसींचा पुरवठा
महानगरपालिका प्रशासनाने केविड लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेता, स्पुटनिक या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr. Reddy Laborotories) यांच्याशी शुक्रवारी (दि.4) संपर्क साधला असता त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसींचा साठा महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शवली आहे.
जून अखेर मिळणार लस
ग्लोबल टेंडर रद्द केले असले तरी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करुन घेण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी स्पुटनिक या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी आज (शुक्रवार) चर्चा केली.
त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर स्पुटनिक लसीचा काही प्रमाणात साठा महापालिकेला जून 2021 अखेरपर्यंत देण्याची तयारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी दर्शवली आहे.
–
जुलै व ऑगस्टमध्ये साठा वाढवणार
स्पुटनिक लसीच्या शीतगृहातील साठवणुकीचे निकष वेगळे आहेत.
त्यामुळे हा साठा मिळाल्यानंतर त्याच्या शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी करण्यात येईल.
तसेच जुलै व ऑगस्ट 2021 या दोन महिन्यात स्पुटनिक लसीचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबत देखील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांना विचारणा करण्यात आली.
या अनुषंगाने येत्या 8 ते 10 दिवसांत पुन्हा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे.