काय सांगता ! होय, शव वाहीनीचे 2 महिन्याचे भाडे झाले तब्बल इतके लाख रूपये, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगर पालिका कोविड-१९ रुग्णांचे मृतदेह स्मशानभूमीत किंवा दफन भूमीपर्यंत वाहून नेण्यासाठी ३९ शववाहीन्या भाडे तत्वावर घेणार आहे. त्यासाठी महापालिका प्रत्येकी शववाहीन्यासाठी २ महिन्यांच्या भाड्याला १० ते १३ लाख रुपये मोजणार आहे.

३९ शववाहीन्या भाडे तत्वावर घेण्यासाठी महापालिकेने निवीदा मागवल्या आहेत. त्यासाठी अंदाजे ४ कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच प्रत्येकी वाहिनी सोबत ४ कामगार पुरवणेही बंधनकारक असणार आहे. प्रत्येक प्रभागात एक आणि १५ शववाहिन्या रुग्णालयात ठेवण्यात येणार आहेत. मृतदेह नेण्यासाठी आतापर्यंत रुग्णवाहिका वापराव्या लागत होत्या. पण, आता लवकरच शववाहीन्या उलपब्ध होतील.

तसेच महापालिका या शववाहीन्यांसोबत ७० रुग्णवाहिका सुद्धा तीन महिन्यांकरिता भाडे तत्त्वावर घेणार आहे. यासाठी प्रत्येकी रुग्णवाहिकेला ३ लाखापेक्षा अधिक खर्च येणार आहे. सध्याच्या काळात महानगरपालिकडे ९० रुग्णवाहिका आहेत. तर २०० बेस्ट बसचे रूपांतर देखील रुग्णवाहिकेत केलं आहे. आतापर्यंत मृतदेह वाहून नेण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर करण्यात येत होता. अनेक वेळा मृतांच्या नातेवाईकांना यासाठी हजारो रुपयांचा खर्च देखील करावा लागत होता. त्याचसोबत काही भागातील स्मशानभूमी मध्ये गर्दी असल्याने रुग्णवाहिकांचाही खोळंबा होत होता.