बीएमसीचं धक्कादायक सत्य- बीएमसीच्या कार्यलयातून महिन्याला दोन लैंगिक छळ

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबई महापालिकेचं लैंगिक छळाबद्दलचं एक सत्य समोर आलं आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापने, कार्यालयांमधून महिन्याला दोन लैंगिक छळाच्या तक्रारी येत असल्याची माहिती समोर आली आहे. दर महिन्याला या महानगरपालिकेत काम करणार्‍या दोन महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी पडत आहेत. मुंबई महापालिकेतील हे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fd29a853-cbcd-11e8-8bbb-67727f322fd4′]

मुंबई महानगरपालिकेची कार्यालये, रुग्णालये, शाळा शहरात ठिकठिकाणी आहेत. शहराव्यतिरिक्त तलावांच्या ठिकाणीही पालिकेचे कर्मचारी काम करत असतात. पालिकेत सध्या 1 लाख 5 हजार कर्मचारी असून त्यापैकी सुमारे 40 टक्के इतके प्रमाण हे महिला कर्मचार्‍यांचं आहे. गेल्या सात वर्षात मुंबई महापालिकेत एकूण १७९ लैंगिक शोषण, लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0445ba87-cbce-11e8-9cf4-e129af4e991a’]

लैंगिक अत्याचार विरोधी प्रतिबंधक पाऊल म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पालिकेकडून २००३ मध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र या नावाने समिती गठित करण्यात आली आहे.

वर्ष दाखल तक्रारी
२०११ ०६
२०१२ १५
२०१३ ३२
२०१४ ३४
२०१५ ३१
२०१६ ३७
२०१७ २४
[amazon_link asins=’B07C8KJBRY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’09f4ce73-cbce-11e8-8973-ede0a54ad8d2′]

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर #MeToo हा ट्रेंड सुरु झाला. त्यानंतर विविध क्षेत्रांमधील अनेक महिला आपल्याला आलेल्या अनुभवांबद्दल उघडपणे बोलू लागल्या. आपल्यावर झालेल्या लैंगिक छळाबाबत महिला बिनधास्तपणे आवाज उठवत आहेत कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून किंवा सहकाऱ्यांकडून झालेल्या लैंगिक शोषणाबाबत या चळवळीतून वाचा फोडली जात आहे. सध्या सोशल मीडिया आणि इतर सर्वच क्षेत्रात #MeToo ही मोहिम जोरात सुरु अाहे.