चालत्या BMW ने घेतला पेट ; पुण्यातील ‘हे’ प्रसिद्ध डॉक्टर थोडक्यात बचावले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद येथून पुण्याकडे जाणाऱ्या डॉ. विलास साबळे (रा. भोसरी, पुणे) यांच्या चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. गाडीतून धूर येत असल्याचे काही नागरिकांनी पाहिल्याने त्यांनी कार थांबविली व पटकन कारमधील सर्वांना बाहेर काढले. त्यानंतर अचानक आगीचा भडका उडून कार आगीत भस्मसात झाली. आज रात्री शहरातील डीएसपी चौकात ही घटना घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे डॉक्टर साबळे यांच्यासह चार जण बचावले.

याबाबत माहिती अशी की, पुण्यातील भोसरी येथील डॉक्टर विलास साबळे हे इतर तीन जणांसमवेत औरंगाबाद येथून पुण्याकडे बीएमडब्ल्यू कार मधून चालले होते. नगरमधील डीएसपी चौकात कार येताच चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. गाडीतून धूर येत असल्याचे मागील बाजूस असलेल्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी कार थांबवली व कारमधील डॉक्टर साबळे व इतरांना पटकन बाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच आगीचा भडका उडाला. आगीने रौद्ररूप धारण करताच नागरिकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. परंतु अग्निशमन दलाचा फोन उचलला गेला नाही. त्यामुळे आग विझवण्यासाठी बंब उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी कार आगीत जळून भस्मसात झाली आहे.

गाडीतील धूर येत असल्याचे पाहून नागरिकांनी थांबून त्यांना बाहेर काढल्याने डॉक्टर साबळे यांनी नगरकरांचे आभार मानले. कारने पेट घेताच नागरिकांनी डीएसपी चौकात मोठी गर्दी केली. तसेच काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

 

You might also like