Board Exam Fee | कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! 10 वी आणि 12 वीचे परीक्षा शुल्क होणार माफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Board Exam Fee | राज्यात कोरोनाने (coronavirus in maharashtra) मागील दीड वर्षात हाहाकार माजवला आहे. या महामारीमुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर कोरोनामुळे अनेक पालकांचा मृत्यू (parents Death) झाल्याने अनेक लहान मुलं आणि विद्यार्थी पोरके झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने (State Government) अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही घेतली आहे. त्यात आता अशा विद्यार्थ्यांसाठी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा शुल्क (Board Exam Fee) माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनाकाळात आपले पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांना 2022 म्हणजेच येत्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मध्ये परीक्षा फी माफ (Board Exam Fee) असणार आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.

पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (HSC) शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.
त्यामुळे सदर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचाल खंडीत होण्याची शक्यता आहे.
म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील अशा बाधित विद्यार्थ्यांचे व्यापक हित विचारात घेऊन राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2021-22 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी तसेच बारावी या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या अशा नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

Web Title : Board Exam Fee | students who lost their parents in corona will not need to pay their exams fees for board exam in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस;
जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी !
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये